आपल्या आरोग्यामध्ये पाण्याला अनन्य साधारण महत्व आहे. दिवसभरातून 3 – 4 लीटर पाणी आपल्या शरीरात जाणं अत्यंत महत्वाचं आहे. आपल्या शरिरात पाण्याच प्रमाण अधिक असतं. म्हणून अनेकदा डॉक्टर देखील भरपूर पाणी पिण्याचा सल्ला देतात. सकाळी उठल्या उठल्या अनेकदा पाणी पिण्याचा सल्ला डायएेशिअन देतात. मग ते पाणी कधी कोमट असतं. तर कधी लिंबू पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. जर तुम्ही योग्य पद्धतीने गरम पाणी प्यायलात तर अनेक रोगांवर असलेल्या घरगुती उपायांपैकी तो एक रामबाण उपाय ठरू शकतो.
- सकाळी कोमट पाण्यात मध व लिंबू घातलेले पाणी पिल्याने वजन कमी होते, परंतु त्यासाठी आणखी बऱ्याच गोष्टी कराव्या लागतात.
- जर तुम्ही अद्याप गरम पाणी पिण्यास सुरुवात केली नसेल तर आजपासून हा उपाय करा. कोमट किंवा गरम पाणी पिण्याचे एक नाही असंख्य फायदे आहेत. यामुळे रक्तदाबापासून ते पचन प्रक्रिया सुरळीत सुरू राहते. शरीरातील रक्त प्रवाहही वाढतो. या सर्व प्रक्रियांचा आपल्या त्वचेवर सकारात्मक परिणाम पाहायला मिळतो.
- ब्रश करण्यापूर्वी पाणी पिऊन दिवसाची सुरूवात केल्यास शरीरातील रक्तप्रवाह सुधारण्यास मदत होते.
- गरम पाण्यामुळे केस आणि त्वचा चांगली राहण्यास मदत होते. पिंपल्सची समस्याही दूर होते. केस अधिक चमकदार होतात. केसांच्यावाढीसाठी गरम पाणी पिणे महत्वाचे आहे.
- गरम पाणी पिण्यामुळे पचन क्रिया चांगली राहते. त्यामुळे गॅसची समस्या दूर होते. किंवा गॅस निर्माण होत नाही.
- तुम्हाला सांधेदुखीचा त्रास असल्यास गरम पाण्याने हा त्रास दूर होतो.
- गरम पाण्यामुळे मुख दुर्गंधी दूर होण्यास मदत होते. हे पाणी प्यायल्याने शरीर ताजेतवाने राहते.
- जे लोक सकाळी उपाशीपोटी पाणी पितात त्यांना कप होत नाही. सकाळी पोट साफ होण्यास मदत होते. त्यामुळे जे खाल्ले जाते त्याचा शरीराला चांगला फायदा होतो. कप दूर झाल्याने अन्य आजारही पळून जातात.