मुळशी पॅटर्न रिमेक हिंदी; सलमान खानचा ‘अंतिम: द फाइनल ट्रुथ’ टीजर रिलीज

0
345

‘मुळशी पॅटर्न’ या चित्रपटाची मराठी मनोरंजनसृष्टीत खूप चर्चा झाली. लेखक-दिग्दर्शक-अभिनेता प्रवीण तरडेनं या सिनेमाचं दिग्दर्शन केलं होतं. या चित्रपटाचा हिंदी रिमेकवर बऱ्याच दिवसापासून चर्चा चालू होती. या बहुचर्चित चित्रपटाचा हिंदी रिमेक सलामान खान यानं आणला आहे. सल्लू आणि आयुष शर्मा यात स्क्रीन शेअर करत आहेत. ‘मुळशी पॅटर्न’च्या रिमेकचं नाव ‘अंतिम : द फायनल ट्रूथ’ असं आहे. नुकताच या चित्रपटाचा फर्स्ट लूक शेअर करण्यात आला आहे.

चित्रपटाचा फर्स्ट लूक सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. शेअर करण्यात आलेल्या सलमानचा अनोखा लूक देखील चाहत्यांच्या पसंतीस उतराला आहे. शेअर करण्यात आलेल्या ३५ सेकंदाच्या टिझरमध्ये सलमान आणि आयुष यांच्या अॅक्शन सीनची झलक दाखवण्यात आली आहे. आयुषनं देखील त्याच्या लुकसाठी विशेष मेहनत घेतल्याचं पाहायला मिळत आहे.

अभिनेता आयुष शर्मा देखील सलमान खानच्या ‘अंतिम: द फाइनल ट्रुथ’ या चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारणार आहे. सध्या सोशल मीडियावर या चित्रपटाचा टीझर व्हायरल झाला आहे. सलमान आणि आयुषच्या फायटींग सीनने टीझरची सुरुवात होते. दरम्यान दोघेही शर्टलेस असल्याचे पाहायला मिळते. या चित्रपटात आयुषचा एक वेगळा लूक पाहायला मिळणार आहे. हा टीझर सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला असून चर्चेचा विषय ठरला आहे.

प्रवीण तरडे यांचा ‘मुळशी पॅटर्न’ हा चित्रपट चांगला चालला. राज्यभरात चांगली कमाई केलेल्या असलेल्या या सिनेमाचं खास स्क्रीनिंग सुपरस्टार सलमान खान आणि अरबाज खान यांच्यासाठी ठेवण्यात आलं होतं. चित्रपटाचे डिओपी महेश लिमये यांच्या शब्दाखातर ते हा चित्रपट पाहण्यासाठी आले होते. हा चित्रपट पाहिल्यानंतर त्यांनाही तो प्रचंड आवडला. चित्रपटात दाखवण्यात आलेला शेतकऱ्यांचा विषय त्यांना आवडल्यामुळे ‘मुळशी पॅटर्न’ ते हिंदीमध्ये घेऊन आले आहेत.