31 डिसेंबरला घराबाहेर पडायचेय; ही नियमावली एकदा वाचा

0
243

नव्या वर्षाचे स्वागत करा, कोरोनाचे नाही, असे आवाहन महाराष्ट्र शासनाने केले आहे. ३१ डिसेंबर आणि १ जानेवारी अशा दोन दिवसांच्या सेलिब्रेशनसाठी नियमावली जाहीर केली आहे. राज्यात २२ डिसेंबर ते ५ जानेवारी रात्री ११ ते सकाळी ६ संचारबंदी लागू करण्यात आली आहे. ब्रिटनमध्ये कोरोना व्हायरसचा नवा प्रकार आढळल्याने खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे.

  • राज्यात 5 जानेवारीपर्यंत रात्री संचारबंदी लागू आहे. त्यामुळे गेटवे, मरिन ड्राइव्ह आदी सार्वजनिक ठिकाणी गर्दी करू नये, अशी सूचनाही करण्यात आली आहे. कोणत्याही धार्मिक, सांस्कृतिक, सामाजिक मिरवणुका 31 डिसेंबरला काढता येणार नाहीत.
  • सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नववर्षाचे स्वागत करण्यासाठी नागरिकांनी शक्यतो घरीच रहावे. दिवसा संचारबंदी नसली तरीही नववर्षाच्या स्वागतासाठी शक्यतो बाहेर पडू नये. घरीच साधेपणाने नव वर्षाचे स्वागत करावे
  • ३१ डिसेंबरच्या दिवशी नागरिकांनी समुद्र किनारी, बागेत, रस्त्यांवर अशा सार्वजनिक ठिकाणी मोठ्या संख्येने गर्दी करु नये. सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे. मास्क आणि सॅनेटायझर्सचा वापर करणं अनिवार्य
  • मुंबईतील गेट-वे ऑफ इंडिया, मरिन लाइन्स, गिरगाव चौपाटी, जुहू चौपाटीसह राज्यातील मोठ्या शहरांमध्ये गर्दी न करता आरोग्याच्या दृष्टीने काळजी घ्यावी.
  • ६० वर्षांच्या वरील नागरिकांनी आणि १० वर्षांखालील मुलांनी घराबाहेर पडणे शक्यतो टाळावे
  • फटाक्यांची आतिषबाजी करण्यात येऊ नये. ध्वनी प्रदूषणाच्या अनुषंगाने नियमांचे काटेकोर पालन करावे
  • महाबळेश्वर पाचगणी या पर्यटनस्थळांमध्ये 31 डिसेंबरच्या रात्री 10 नंतर कोणतेही कार्यक्रम सुरू ठेवण्यास बंदी घालण्यात आली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 144 कलमनुसार सातारा जिल्हाधिकारी यांनी आदेश काढले आहेत. जिल्हयातील हॉटेल व्यावसायिकांना देखील रात्री 11 पर्यंतच हॉटेल्स चालू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे.

पोलिसांनी केले हे ट्विट

कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झालेला असला तरी, धोका टळलेला नाही. म्हणूनच पोलिसांनी नव्या वर्षाच्या स्वागताला होणारी गर्दी ध्यानी घेऊन एक ट्विट केले आहे.

सुरक्षेला सलाम नमस्ते म्हणा, करोनाला नाही. रात्री ११ च्या आत पार्टी संपवा आम्हाला व्हॉट्स गोइंग ऑन विचारण्याची संधी देऊ नका, असे ट्विट मुंबई पोलिसांनी केले आहे.