Web Series 2020 : या वर्षी मनोरंजन क्षेत्र वेबसिरीजने गाजवले

0
634

2020 मध्ये प्रत्येक क्षेत्रात बदल झालाय, काही क्षेत्रात तर असेही बदल झालेत जे किमान 5 वर्षांनी होणे अपेक्षित होते. त्यातले पहिले क्षेत्र म्हणजे मनोरंजन क्षेत्र. कोरोनामुळे बंद झालेल्या थिएटरला पर्याय म्हणून ओटीटीचा मार्ग अवलंबला गेला. आता या ओटीटी माध्यमांना आणि त्यावर येणार्‍या कंटेंटला मिळणार्‍या प्रतिसादावर मी याआधीही लिहिलंय, पण 2020 मध्ये मनोरंजन क्षेत्रात वेबसिरीजचा ज्याप्रकारे शिरकाव झाला आणि त्याला जितका प्रचंड प्रतिसाद मिळाला, याबद्दल कुठेही जास्त लिहिलेलं आढळलं नाही.

कोरोना महामारीमुळं अनेक महिने लॉकडाऊन होता. अशा काळात ओटीटी प्लॅटफॉर्म्सनं प्रेक्षकांचं चांगलं मनोरंजन केलं. यावर्षी अनेक वेबसीरिज आल्या ज्यांनी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. यातील एक एक पात्र लोकांच्या लक्षात राहिलं. आज आपण जाणून घेणार आहोत २०२० मध्ये कोणकोणत्या वेबसीरिज ने लोकांचे मनोरंजन केले.

हिंदी वेबसिरीजमध्ये चर्चिल्या गेलेल्या वेबसिरीजचा जॉनर हा क्राईम, थ्रिलरच होता, मात्र यावर्षात हा जॉनर वगळतादेखील अनेक अशा वेबसिरीज आहेत ज्यांना प्रेक्षकांनी प्रतिसाद दिलाय. मिर्झापूर 2, असुर, ब्रीद 2, पाताल लोक, आश्रम यांसारख्या क्राईम थ्रिलर वेबसिरीजबद्दल आणि त्यांना मिळालेल्या प्रतिसादाबद्दल सर्वांनाच माहिती आहे, पण यासोबतच स्कॅम 1992, बंदिश बँडिट्स, पंचायत, जेएल 50, बेताल यांसारख्या विविध जॉनरवर आधारित वेबसिरीजदेखील आहेत ज्या प्रदर्शित झाल्या आणि त्याला लोकांनी प्रतिसाद दिलाय.

मिर्झापूर’ 2019 मध्ये पहिल्यांदा प्रदर्शित झाली. त्याचा दुसरा भाग 2020 मध्ये प्रदर्शित झाला. गूगलवर या सीरिजला सर्वाधिक सर्च मिळाले. यातील मुन्ना भैय्या, कालीन भैय्या, गुड्डू ही पात्र प्रेक्षकांच्या पसंतीला उतरली.

स्कॅम 1992 वर्ष 2020 मध्ये रिलीज झालेली वेबसीरिज प्रेक्षकांना फारच आवडली. हर्षद मेहताच्या आयुष्यावर आधारीत ही वेबसीरिज प्रचंड गाजली. हर्षद मेहताचं पात्र साकारणाऱ्या प्रतिक गांधीचंही खूप कौतुक झालं.

2020 मध्ये पाताललोक ही वेबसीरिज देखील तुफान लोकप्रिय झाली. काही लोकांनी याला विरोध केला. मात्र ही वेबसीरिज खूप चर्चित राहिली. यात जयदीप अहलावत, आसिफ बसरा, स्वस्तिका मुखर्जी आणि अभिषेक बनर्जी या कलाकारांच्या भूमिकांचं खूप कौतुक झालं.

आश्रम वेबसीरिज देखील खूप पाहिली गेली. बॉबी देओलच्या अभिनयाचं कौतुक या सीरिजमुळं झालं. आश्रमच्या पहिल्या भागासोबत दुसऱ्या भागालाही प्रेक्षकांची चांगली पसंती मिळाली.