लाइफलाइन एक्स्प्रेस’: भारताने बनवली जगातील पहिली हॉस्पीटल ट्रेन

0
274

भारतीय रेल्वेने आज इतिहास रचला आहे. भारतात एक खास ट्रेन सुरू होणार आहे़ जी संपूर्ण जगात कुठल्याही देशाने अद्याप सुरू केलेली नाही. भारतीय रेल्वेने जगातील पहिली हॉस्पीटल ट्रेन बनवली आहे. भारतीय रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, ट्रेनमध्येच रुग्णालयातील सर्व सेवा उपलब्ध असणा-या या ट्रेनचे नाव लाइफलाइन एक्स्प्रेस असे ठेवण्यात आले आहे. रेल्वेच्या अधिकृत ट्विटर हँडलवर या एक्स्प्रेसचे फोटो ट्विट करण्यात आले आहेत.

भारतीय रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, ट्रेनमध्येच रुग्णालयातील सर्व सेवा उपलब्ध होतायत, अत्याधुनिक उपकरणं आणि डॉक्टरांची एक टीम तैनात आहे. लाइफलाइन एक्स्प्रेस’ असं ट्रेनचं नाव आहे. ट्रेनच्या माध्मातून रुग्णांवर मोफत उपचार होणार आहे. ट्रेनमध्ये अत्याधुनिक उपकरणं आणि डॉक्टरांची एक टीम तैनात असणार आहे. सध्या ट्रेन आसामच्या बदरपूर स्टेशनवर आहे. या ट्रेनमध्ये हॉस्पीटलमधील सर्व अत्याधुनिक सेवा, उपकरणे आणि डॉक्टरांची एक टीम तैनात आहे. यात दोन अत्याधुनिक ऑपरेशन थिएटर आणि पाच ऑपरेटिंग टेबलसह इतर सर्व सुविधा आहेत.

लाइफलाइन एक्स्प्रेसमध्ये नेमके काय?
ही ट्रेन एकूण ७ डब्ब्यांची आहे. यात अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि चिकित्सकांची टीम तैनात आहे. या विशेष ट्रेनमध्ये आतापर्यंत १ लाख ४६ हजार रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. ट्रेनमध्ये कर्करोग, मोती बिंदू अशा अनेक आजारांवर उपचार केले जातात. सर्वात प्रथम भारतानेच अशाप्रकारच्या हॉस्पीटल ट्रेनची उभारणी केली आहे. त्यानंतर आता इतर देशही अशी ट्रेन सुरू करण्याचा विचार करत आहेत.