Tandav Trailer: सैफच्या आगामी सीरिज तांडवचा ट्रेलर प्रदर्शित

0
191

बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानची वेब सीरीज ‘तांडव’ चे ट्रेलर आज रिलीज झाले आहे. बऱ्याच दिवसांपासून चाहते सैफ अली खानची वेब सीरीज तांडवची आतुरतेने वाट पाहत आहेत. ज्यानंतर आता हा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. या वेब सीरीजमध्ये सैफ अली खानची पूर्णपणे बदललेली स्टाईल दिसत आहे. या सीरीजची स्टोरी राजकारणावर आधारित आहे.

तांडव’ या वेब सीरिजच्या कथानकात राजकीय पार्श्वभूमी दाखवण्यात आली आहे. नुकताच प्रदर्शित झालेल्या २ मिनिटे ५९ सेकंदाच्या ट्रेलरमध्ये दिल्लीमध्ये घडणाऱ्या ‘तांडव’मध्ये सत्तासंघर्ष दाखवण्यात आला आहे. सत्तेच्या खेळात चूक किंवा बरोबर, सत्ता मिळवणं, ती टिकवणं आणि त्यासाठी शक्य असेल ते सगळं करणं हे सर्व या सीरिजमध्ये दाखवण्यात येणार आहे. या सीरिजमध्ये सैफ अली खान हा एका राजकीय नेत्याची भूमिका साकारणार असल्याचे दिसत आहे. सैफचा हा हटके अंदाज पाहण्यासाठी चाहते फार उत्सुक आहेत.

या वेब सीरीजमध्ये डिंपल कपाडिया, दिनो मोरिया, तिग्मांशू धुलिया, गौहर खान, मोहम्मद झीशान, कृतिका कामरा, सुनील ग्रोवर, अनूप जोशी, कुमुद मिश्रा हे महत्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे. तांडव वेब सीरीज 15 जानेवारीला अॅमेझॉन प्राइमवर प्रदर्शित होणार आहे.

‘तांडव’ अली अब्बास जफर हे दिग्दर्शित करणार आहेत, ज्यांनी ‘भारत’, ‘टायगर जिंदा है’ आणि ‘गुंडे’ सारख्या अनेक बॉलिवूड हिट चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. सैफचे चाहते आता त्याच्या या वेब सीरीजची आतुरतेने वाट पाहत आहेत. या वेब सीरीज शिवाय सैफ अली खान प्रभास स्टारर फिल्म ‘आदिपुरुष’ मध्येही दिसणार आहे. या चित्रपटात सैफ रावणची भूमिका साकारत आहे.