भाबीजी घर पर है’मध्‍ये अनिता भाभीच्‍या भूमिकेत झळकणार अभिनेत्री नेहा पेंडसे

0
289

छोट्या पडद्यावर गाजत असलेल्या ‘भाबीजी घर पर है’ या विनोदी मालिकेत अनिता भाभीची भूमिका कोण साकारणार, याबाबत खूप चर्चा रंगली होती. अखेर सर्व तर्कवितर्कांना पूर्णविराम लागला आहे. या रोलसाठी अनेक प्रसिद्ध अभिनेत्रींची नावं चर्चेत आली होती. शेवटी सौम्या टंडनच्या जागी अभिनेत्री नेहा पेंडसेंची वर्णी लागली आहे. खूप प्रतिक्षेनंतर आपल्‍या विभुती नारायण मिश्राचे (आसिफ शेख) त्‍याच्‍या पत्‍नीसोबत पुनर्मिलन होणार आहे. मालिकेत नेहा नवीन रूपामध्‍ये दिसेल.

या मालिकेत याआधी अभिनेत्री सौम्या टंडन अनिता भाभीची भूमिका साकारत होती. पण काही महिन्यांपूर्वी तिने ही मालिका सोडली. ती गेल्या पाच वर्षांपासून ‘भाबीजी घर पर है!’ मालिकेचा भाग होती. आता ‘मॅडम जी’ फेम नेहा पेंडसे ‘गोरी मॅम’ची भूमिका साकारताना दिसणार आहे. ‘मे आय कम इन मॅडम’ मालिकेत नेहाने मुख्य भूमिका साकारली होती. या मालिकेची निर्मिती बिनायफर आणि संजय कोहली यांनी केली होती. या दोघांनीच ‘भाबीजी घर पर है !’ मालिकेची निर्मिती केली आहे.

सौम्या टंडन मालिका सोडून गेल्यानंतर निर्मात्यांनी मराठमोळ्या नेहा पेंडसेला विचारणा केली.आधी नेहाने या भूमिकेसाठी नकार दिला होता मात्र आता तिने या प्रोजेक्टला होकार दिला.

मालिकेमध्‍ये बोलताना नेहा पेंडसे म्‍हणाली, ”भारताची लाडकी अनिता भाभी कोण असेल, याबाबत महिन्‍यांपासून अनेक अपेक्षा व अंदाज वर्तवले जात होते. प्रेक्षक नवीन अनिता भाभीबाबत जाणून घेण्‍यासाठी तितकेच उत्‍सुक असण्‍यासोबत आतुरतेने वाट पाहत आले आहेत. मला मागील सहा वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन करणारी ‘भाबीजी घर पर है’ या मालिकेचा भाग असण्‍याचा खूप आनंद झाला आहे. ही मोठी जबाबदारी आहे आणि निश्चितच मोठी उणीव भरून काढण्‍याची गरज आहे. पण, मला खात्री आहे की प्रेक्षक त्‍यांच्‍या नवीन अनिता भाभीवर तितकेच प्रेम व आपुलकीचा वर्षाव करतील. मी लवकरच शूटिंग सुरू करण्‍यास उत्‍सुक आहे