भंडारा जिल्हा रुग्णालय: १० बालकांच्या मृत्यूमुळे महाराष्ट्र हळहळला; हॉस्पिटलमध्ये नेमकं काय घडलं?

0
654
  • शॉर्ट सर्किटमुळे रात्री 2 च्या सुमारास लागली आग
  • दहा बालकांचा दुर्दैवी मृत्यू

नुकतेच जगात आलेल्या 10 नवजात बालकांचा गुदमरुन मृत्यू झाल्याची ह्रदयद्रावक घटना भंडारा जिल्ह्यातील सामान्य रुग्णालयामध्ये घडली आहे. मध्यरात्री अचानक आग लागल्यामुळे अतिदक्षता नवजात केयर युनिटमध्ये ( SNCU ) आग लागल्यामुळे दहा बालकांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मृत्युमुखी पडलेली बालकं एक ते तीन महिने या वयोगटातील आहेत. ज्या बालकांचं वजन कमी आहे किंवा प्रकृती नाजूक आहे, अशा बालकांनाच अतिदक्षता नवजात केयर युनिटमध्ये ठेवलं जातं.

शुक्रवारी मध्यरात्री 2 च्या सुमारास ही आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे. धुरामुळे गुदमरुन या बाळांचा मृत्यू झाल्याचं बोललं जात आहे.आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी संपूर्ण घटनेची माहिती रुग्णालय प्रशासनाकडून घेतली आहे. शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज असल्याचं त्यांनी म्हटलंय. लहान बाळांच्या अतिदक्षता विभागात धूर निघत असल्याचं तिथं कामावर असलेल्या नर्सच्या लक्षात आलं. तिनं दार उघडून पाहिलं असता अतिदक्षता विभागात धुराचं साम्राज्य पसरल्याचं पाहायला मिळालं.

जिल्हा सामान्य रुग्णालयातील आऊटबॉर्न युनिटमधून रात्री दोनच्या दरम्यान अचानक धूर निघत असल्याचं समोर आलं. ड्युटीवर असलेल्या नर्सने दार उघडून बघतला असता त्या रुममध्ये मोठ्या प्रमाणात धूर होता, त्यामुळे त्यांनी लगेच रुग्णालयातील अधिकाऱ्यांना सांगितले. त्यानंतर अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचून रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या मदतीने बचावकार्य सुरु करण्यात आलं.

सामान्य रुग्णालयाच्या SNCU मध्ये एकूण 17 नवजात बालक दाखल होती. शनिवारच्या मध्यरात्री जवळपास 2 वाजेच्या सुमारास अचानक आग लागली. जिल्हा सामान्य रुग्णालयातील आऊट बोर्ण युनिटमधून धूर निघत असल्याचे समोर आले ड्युटीवर असलेल्या नर्सने दार उघडून बघितला असता त्या रूममध्ये मोठ्या प्रमाणात धूर होता.

त्यामुळे त्यांनी लगेच दवाखान्यातील अधिकाऱ्यांना सांगितले. त्यानंतर तातडीने अग्निशमन दलाला माहिती देण्यात आली. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी पोहोचून दवाखान्यातील लोकांच्या मदतीने बचावकार्य सुरू करण्यात आले. या SNIC मध्ये फुटबॉल आणि इन वन अशी दोन युनिट आहेत. यापैकी मॉनिटरमध्ये असलेले सात बालक वाचविण्यात आले तर औट बॉल युनिटमधील 10 मुलांचा मृत्यू झाला आहे.

दरम्यान आपल्या नवजात बालकांना गमावल्याने आई-वडिलांसह कुटुंबियांनी टाहो फोडला. रुग्णालयाबाहेर लोकांची गर्दी झाली आहे. या आगीच्या घटनेची चौकशी करण्याची मागणी हे लोक करत आहेत. तर रुग्णालयाच्या निष्काळजीपणामुळे दहा बालकांचा नाहक बळी गेल्याचा आरोप काहींनी केला आहे.

या घटनेमुळे भंडाऱ्यात खळबळ उडाली आहे. आता भंडारा जिल्हा शासकीय रुग्णालयातील 10 बाळांच्या मृत्यूला जबाबदार कोण? असा सवाल सर्वसामान्य नागरिक करत आहेत.