ठाकरे सरकारचा दणका: देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरेंसह ‘या’ बड्या नेत्यांच्या सुरक्षेत कपात

0
214

ठाकरे सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. राज्यातील भाजपच्या बड्या नेत्यांच्या सुरक्षेत कपात करण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे. माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, भाजपचे आमदार प्रसाद लाड यांच्या सुरक्षाव्यवस्थेत मोठी कपात करण्यात आली आहे. तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची देखील झेड सिक्युरीटी काढण्यात आली असून आता राज ठाकरे यांना वाय प्लस (y+) सुरक्षा देण्यात येईल. मात्र Adv. उज्ज्वल निकम आणि शत्रुघ्न सिन्हा यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.

दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत सुरक्षाविषयक बैठक झाली होती. त्या बैठकीत अतिमहत्त्वाच्या व्यक्तींना देण्यात येणार सुरक्षेविषयी चर्चा करण्यात आली. त्यावेळी नेत्यांच्या सुरक्षेत कपात करण्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांनी हिरवा कंदील दाखवला. या नेत्यांमध्ये देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, प्रसाद लाड, राज ठाकरे, नारायण राणे, रावसाहेब दानवे यांच्यासह काही विद्यमान मंत्र्यांच्या समावेश असल्याचे समोर आले आहे.

देवेंद्र फडणवीस यांच्या सुरक्षेत कपात करत त्यांच्या ताफ्यातील बुलेटप्रुफ गाडीसुद्धा काढून घेतली जाणार असल्याची माहिती आहे. राज्य सरकारने नुकताच हा निर्णय घेतला फडणवीस यांच्यासह महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या सुरक्षेतही राज्य सरकारने कपात केली आहे.

मनसे प्रमुखांची झेड सिक्युरिटी काढण्यात आली
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचीही झेड सिक्युरिटी आता काढून टाकण्यात आली आहे. त्याऐवजी आता वाय प्लस सुरक्षा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यांच्या ताफ्यातील बुलेटप्रूफ गाडीही काढण्यात येणार आहे.

राज्यपाल Z +

मुंख्यमंत्री उद्धव ठाकरे Z +

विरेधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस Z + वरून कमी करून Y+ आणि एस्कॉर्ट
शरद पवार Z +
आदित्य ठाकरे Z
अजित पवार Z
अनिल देशमुख Z
अण्णा हजारे Z
राज ठाकरे Z + वरून कमी करून Y+ आणि एस्कॉर्ट
बाळासाहेब थोरात – Y + आणि escort
नितीन राऊत Y + आणि escort
जयंत पाटील Y + आणि escort
संजय राऊत Y + आणि escort
तेजस ठाकरे Y + आणि escort
छगन भुजबळ Y + आणि escort
रामदास आठवले – Z TO Y + मात्र एस्कॉर्ट नाही.
रश्मी ठाकरे Y + आणि एस्कॉर्ट
चंद्रकात पाटील यांची Y सुरक्षा काढली, आता आमदार म्हणून जी सुरक्षा असते ती मिळणार.
राम कदम यांची सुरक्षी काढली, आमदारांना असणारी सुरक्षा मिळणार.
प्रसाद लाड सुरक्षा काढली आता आमदारांना असणारी सुरक्षा मिळणार.
अमृता देवेंद्र फडणवीस Y वरून X*
देवेंद्र फडणवीस यांची मुलगी दिविजा Y वरून X
अशोक चव्हाण Y+
पृथ्वीराज चव्हाण Y+
मिलिंद नार्वेकर Y+