नव्या Privacy policy बाबत Whatsapp चं स्पष्टीकरण

0
428

नेहमी युजर्ससाठी नवनवीन फिचर्स लाँच करणाऱ्या WhatsApp ने या वर्षांच्या सुरुवातीला नवीन फिचर आणण्याऐवजी नव्या अटी आणि शर्ती आणल्या आहेत. जर तुम्ही या अटी-शर्ती अमान्य केल्या तर तुमचं अकाऊंट डिलीट केलं जाईल. या अटी मान्य करण्यासाठी कंपनीने युजर्सना 8 फेब्रुवारीपर्यंतची मुदत दिली आहे. दरम्यान, WhatsApp च्या या नव्या धोरणामुळे अनेक युजर्स नाराज आहेत. अशात आता कंपनीने आपल्या नवीन पॉलिसीबाबत पुन्हा एकदा स्पष्टीकरण दिलं आहे. पॉलिसीमध्ये बदल झाल्याने मित्र किंवा कुटुंबियांसोबत केलेल्या तुमच्या चॅटिंगच्या गोपनियतेवर कोणताही परिणाम होत नाही, असं स्पष्टीकरण WhatsApp कडून देण्यात आलं आहे. नवीन पॉलिसी केवळ बिजनेस युजर्ससाठी आहे असा दावाही कंपनीने केलाय.

तुमचे खासगी मेसेज आधीप्रमाणेच 100 टक्के एंड-टू-एंड एन्क्रिप्शनअंतर्गत सुरक्षित ठेवले जातील. पॉलिसीमध्ये बदल झाल्याने मित्र किंवा कुटुंबियांसोबत केलेल्या तुमच्या चॅटिंगच्या गोपनियतेवर कोणताही परिणाम होणार नाही असं स्पष्टीकरण व्हॉट्सअ‍ॅपने ट्विटरद्वारे दिलं आहे. कंपनीने याबाबत दुसऱ्यांदा स्पष्टीकरण दिलं आहे. नवीन पॉलिसी केवळ बिजनेस युजर्ससाठी आहे’, असा दावा कंपनीने पहिल्यांदा स्पष्टीकरण देतानाही केला होता.

व्हॉट्सअ‍ॅपने ट्विटरवर एक फोटो शेअर केला आहे. त्यात त्यांनी म्हटलं आहे की, तुम्ही शेअर केलेले लोकेशन्स प्रायव्हेट असतात. तुमची कॉन्टॅक्ट लिस्ट आमच्या सर्व्हरमध्ये अपलोड केलेली असते परंतु आम्ही ती कधीही फेसबुकसोबत शेअर करत नाही. क्रॉस मेसेजिंग प्लॅटफॉर्म आणि व्हॉईस ओव्हर आयपी सर्व्हिस प्रोव्हायडर असलेल्या या कंपनीने पुन्हा एकदा नव्या गोपनियता धोरणाबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. यापूर्वीदेखील कंपनीने याबाबत स्पष्टीकरण दिलं होतं, त्यात त्यांनी म्हटलं होतं की, नव्या गोपनीयता धोरणाचा केवळ बिझनेस अकाऊंट्सवर परिणाम होईल.

WhatsApp तुमचे खासगी मेसेज वाचत नाही किंवा कॉलही ऐकत नाही. शिवाय फेसबुकलाही याची परवानगी दिलेली नाही.
-WhatsApp तुमचे मेसेज आणि कॉल हिस्ट्री सेव्ह करत नाही.
-WhatsApp तुम्ही शेअर केलेली लोकेशन बघत नाही किंवा फेसबुकसोबतही शेअर करत नाही.
-WhatsApp तुमची कॉन्टॅक्ट लिस्ट फेसबुकसोबत शेअर करत नाही.
-WhatsApp ग्रुप अजूनही पूर्णतः प्रायव्हेट आहेत.
-तुम्ही मेसेज आपोआप डिलिट करण्यासाठी सेट करु शकतात.