गावाचा विकास हाच माझा पण विकास: शंकर लहू गोपाळे

0
434

राज्यामध्ये ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी अंतिम टप्प्यात आली आहे . गावोगावी निवडणूक मध्ये कोण जिंकणार आणि कोण बाजी मारणार अशा गप्पा रंगू लागल्या आहेत. खेड तालुक्यातही ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी पाहायला मिळत आहे. कारकुडी टोकावडे गावाची संयुक्त ग्रामपंचायत निवडणुकीची तयारी अंतिम टप्प्यात असून उमेदवारही घरोघरी जाऊन आणि ग्रामसभा घेऊन आपणच जिंकू या आशेने तयारी करत आहे.

मा. तंटामुक्त समितीचे अध्यक्ष शंकर लहू गोपाळे यांनीही ग्रामपंचायत निवडणुकीसासाठी रणशिंग फुंकले असून प्रचारात आघाडी घेतली आहे. पारंपरिक प्रचारासोबतच हायटेक प्रचाराला प्राधान्य दिले असून सोशल मीडियाचाही वापर योग्यरित्या शंकर गोपाळे यांनी केला आहे. गावामध्ये प्रत्येक ग्रामस्थासोबत आधीपासूनच चांगले संबंध असल्याने तसेच मदत करण्याच्या सवयीने ग्रामस्थांमध्येही शंकर गोपाळे यांची लोकप्रियता वाढू लागली आहे.

निवडणुकीला उभे राहण्याचे कारण म्हणजे मला फक्त राजकारण आवडते म्हणून नाही तर गावाचा विकास करायचा आहे म्हणून मी तुमच्यासमोर उभा आहे. सर्वांना एकत्र घेऊन गावातील समस्यांना दूर करायचे आहे आणि गावातील प्रत्येक ग्रामस्थांना आनंदी पाहायचे आहे असे मत ग्रामसभेदरम्यान शंकर गोपाळे यांनी व्यक्त केलं.

पुणे जिल्ह्यातील कारकुडी टोकावडे ग्रामपंचायत निवडणूक चुरशीची होणार यात शंका नाही मात्र शंकर गोपाळे हे निवडून येतील असे मत ग्रामस्थ व्यक्त करत आहे.

शंकर लहू गोपाळे यांनी महात्मा गांधी तंटामुक्त समितीचे अध्यक्षपद भूषविले असून त्यादरम्यान गावामध्ये सलोखा निर्माण करण्याचा चांगल्या प्रकारे काम केलं आहे. शंकर लहू गोपाळे यांनी कोरोनाच्या काळात ठाकरवस्ती येथे लोकांना मोफत धान्य वाटप केले होते