ग्रामपंचायत निवडणूका: राळेगणसिद्धी मध्ये ३५ तर हिवरेबाजारमध्ये ३० वर्षांनंतर प्रथमच निवडणुका

0
576

अहमदनगर जिल्ह्यातील ‘आदर्श गाव’ म्हणून नावाजलेल्या हिवरे बाजार आणि राळेगण सिद्धी इथल्या निवडणुकीकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.कारण नगर जिल्ह्यातील सर्वाधिक चर्चेचा विषय ठरलेल्या आदर्श गाव हिवरे बाजार मध्येही प्रथमच 30 वर्षानंतर निवडणुका होत आहे.अहमदनगर जिल्ह्यातील ‘आदर्श गाव’ म्हणून नावाजलेल्या हिवरे बाजार आणि राळेगण सिद्धी इथल्या निवडणुकीकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. कारण गेल्या 30 वर्षांपासून बिनविरोध सरपंचाची निवड होणाऱ्या या गावांमध्ये आता मात्र निवडणूक होणार आहे.

हिवरे बाजार

  • हिवरे बाजारची ग्रामपंचायत तब्बल 30 वर्षं बिनविरोध राहिली. आता मात्र इथं ग्रामपंचायतची निवडणूक होत आहे.
  • इथली ग्रामपंचायत 7 जण सदस्यांची असून सगळ्या जागांसाठी निवडणूक होत आहे.
  • हिवरे बाजारचे विद्यमान उपसरपंच पोपटराव पवार यांच्या नेतृत्वाखाली ग्रामविकास पॅनेल निवडणूक लढवत आहे.

राळेगण सिद्धी

  • ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या राळेगण सिद्धीत 35 वर्षं बिनविरोध निवडणूक झाली. पण गेल्यावेळपासून ही परंपरा मोडीत निघाली आहे. यंदाही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न करण्यात आले, पण त्यात यश आलं नाही.
  • राळेगण सिद्धीत 3 वॉर्ड असून 9 सदस्यांची ही ग्रामपंचायत आहे. सद्यघडीला इथले 2 उमेदावर बिनविरोध ठरले असून आता 7 जागांसाठी निवडणूक होत आहे.
  • निवडणूक बिनविरोध होत नसल्यामुळे या निवडणुकीच्या निकालाकडेही सगळ्यांचं लक्ष आहे.
  • राळेगण सिद्धीत ‘राळेगणसिद्धी ग्रामविकास पॅनेल’ विरुद्ध ‘श्री श्याम बाबा पॅनेल’ असा सामना रंगणार आहे.