ईदच्या दिवशी थिएटरमध्येच रिलीज होणार ‘राधे’ चित्रपट

0
272
  • सलमानने नाकारली कोट्यवधींची ऑनलाईन ऑफर; ‘राधे’ थिएटरमध्येच होणार प्रदर्शित

बॉलिवूडचा भाईजान सलमान खान एक नवा चित्रपट घेऊन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या आगामी चित्रपटाचं नाव ‘राधे : युअर मोस्ट वाँटेड भाई’ असं आहे. या चित्रपटाला ऑनलाईन प्रदर्शित करण्यासाठी तब्बल २५० कोटी रुपयांची ऑफर मिळाली होती. परंतु सलमाननं ओटीटीला साफ नकार दिला आहे. हा चित्रपट कुठल्याही परिस्थितीत थिएटरमध्येच प्रदर्शित होईल, अशी भूमिका त्याने घेतली आहे.

सलमान खानने स्वत: याची माहिती दिली. हा चित्रपट थिएटरमध्ये रिलीज करण्याची विनंती थिएटर एग्जिबिटर्स एसोसिएशनने केली होती आणि त्यांनी ही बाब लक्षात घेऊन त्यांनी ईदच्या दिवशी हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होणार असल्याचं सांगितलं आहे. याशिवाय ट्वीटमध्ये सलमानने सर्व थिएटर मालकांना कोरोना काळात अधिक खबरदारी घेण्याचं आवाहन केलं आहे. थिएटरमध्ये राधे पाहण्यासाठी येणाऱ्या प्रेक्षकांच्या आरोग्याची काळजी घेणं गरजेचं असल्याचंही त्याने यात म्हटलं आहे.

माफ करा, सिनेमागृहांच्या मालकांसोबत चर्चा सुरु असल्यामुळे मला उत्तर द्यायला थोडा उशीर झाला. सध्या करोनामुळे परिस्थिती फारच बिकट झाली आहे. थिएटरचे मालक आणि एक्सहिबिटर्स सध्या आर्थिक संकटांचा सामना करत आहेत. त्यामुळे त्यांच्या मदतीसाठी राधे हा चित्रपट मी थिएटरमध्येच प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला. त्याबदल्यात त्यांनी माझ्या चाहत्यांना चांगल्या सुविधा आणि अत्याधुनिक सुरक्षितता द्यावी ही विनंती. इंशाअल्लाह २०२१ मध्ये ईदच्या मुहुर्तावरच चित्रपट प्रदर्शित होईल.” अशा आशयाचं ट्विट सलमान खानने केलं आहे. त्याचं हे ट्विट सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.