बायडन आज अमेरिकेचे 46वे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेणार आहेत. बायडन यांच्या शपथविधी सोहळ्यापूर्वी अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टनला पूर्णपणे छावणीचं स्वरुप प्राप्त झालं आहे. नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांची सुरक्षा आणि शपथविधी सोहळ्याला गालबोट लागू नये म्हणून वॉशिंग्टनमध्ये मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. जवळपास 25 हजारांहून अधिक सुरक्षारक्षक तैनात करण्यात आले आहेत.
कोव्हिड-१९’ च्या प्रादुर्भावामुळे या वेळचा शपथविधी सोहळा तुलनेने मर्यादित स्वरूपात व साधेपणाने होणार आहे. सामान्य नागरिकांना या वेळी कमी प्रमाणात प्रवेश असणार आहे. मात्र, तरीही कोणत्याही प्रकाराची स्थिती हाताळण्यास आम्ही सज्ज आहोत,’ असे वॉशिंग्टन डीसीचे महापौर मुरियल बाऊजर यांनी सांगितले.
शपख घेतल्यानंतर जो बायडन देशाला संबोधित करणार आहेत. असं मानलं जात आहे की, या संबोधना दरम्यान बायडन पुढील 4 वर्षांसाठी राष्ट्राप्रतीचं त्यांचं व्हिजन सांगू शकतात. मिळालेल्या माहितीनुसार, जो बायडन कोरोनाविरोधातील लढा, अमेरिकेची अर्थव्यवस्था आणखी मजबूत करण्यासोबतच राष्ट्राची एकता अबाधित ठेवण्यासाठी आपल्या योजनांवर प्रकाश टाकतील.
राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतल्यानंतर जो बायजडन यांना पगार आणि इतर सर्व भत्ते मिळण्यास सुरुवात होणार आहे. जाणून घेऊया राष्ट्रपती म्हणून बायडन यांचा पगारासंदर्भातील काही गोष्टी, तसेच त्यांना मिळणाऱ्या सुविधांबाबत…
न्यूयॉर्कमधील एका वेबसाइटने दिलेल्या माहितीनुसार, त्यांचा वार्षिक पगार जवळपास चार लाख अमेरिकन डॉलर इतका असणार आहे. जर भारतीय चलनात याचं मुल्य सांगायच झालं तर, जवळपास 2 कोटी 92 लाख रुपये. याव्यतिरिक्त राष्ट्राध्यक्ष म्हणून 50 हजार डॉलर्सचा वार्षिक भत्ताही मिळतो. तसेच एक लाख डॉलर्सचा नॉन टॅक्सेबल प्रवासी भत्ताही दिला जातो.
जो बायडेन यांच्या शपथविधीनंतर यावेळी त्यांच्या पहिल्यावहिल्या भाषणाकडे (inaugural address) संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. हे भाषण लिहण्यात एका भारतीय वंशाच्या व्यक्तीने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. विनय रेड्डी (Vinay Reddy) असे त्यांचे नाव असून ते जो बायडन आणि कमला हॅरिस यांच्यासाठी भाषण लिहून देण्याचे काम करतात. यापूर्वी राष्ट्राध्यक्षपद निवडणुकीच्या प्रचारावेळीही विनय रेड्डी यांनी या दोन्ही नेत्यांसाठी भाषणे लिहली होती. बराक ओबामा यांच्या काळातही विनय रेड्डी उपराष्ट्रपती असलेल्या जो बायडन यांचे प्रमुख भाषण लेखक होते.
काय आहे अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या भाषणांचा इतिहास?
जॉर्ज वॉशिंग्टन यांच्यापासून अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या inaugural address च्या प्रथेला सुरुवात झाली. 30 एप्रिल 1789 रोजी जॉर्ज वॉशिंग्टन यांनी पहिल्यांदा अशाप्रकारचे भाषण दिले. यामध्ये स्वातंत्र्य आणि मुक्त सरकार अशा संकल्पनांचा समावेश होता. राष्ट्राध्यक्षपदाच्या दुसऱ्या कारकीर्दीत 1793 लावी जॉर्ज वॉशिंग्टन यांनी अवघ्या 135 शब्दांचे भाषण केले. हे अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचे सर्वात लहान भाषण आहे. तर 1841 साली विल्यम हेन्री हॅरिसन यांनी केलेल्या भाषणात 8,455 शब्द होते. हे भाषण दोन तास सुरु होते.