Budget 2021: खासदारांना कँटीनचे नाही तर आता 5 स्टार हॉटेलचे जेवण;५२ वर्षांची परंपरा मोडीत

0
425

संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु झाले असून राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अभिभाषणाने या अधिवेशनाला सुरुवात झाली. देशाचा २०२१-२२ चा अर्थसंकल्प १ फेब्रुवारीला संसदेत सादर होणार आहे. दरम्यान, यंदा संसदेत एक मोठा ऐतिहासिक बदल होणार असून हा बदल भोजनाबाबत आहे. यंदा खासदार संसद भवन संकुलाच्या कॅन्टीनमधील जेवणाचा आस्वाद घेणार नाही. तर चक्क फाईव्ह स्टार हॉटेलच्या जेवणार ताव मारणार आहेत. अर्थसंकल्प सादर होताना लोकसभा सदस्यांना मिळणारे जेवण उत्तर रेल्वेकडून (Northern Railways) देण्यात येणार नाही. 52 वर्षांपासून उत्तर रेल्वेकडून जेवण मिळत होते. यात आता खंड पडणार आहे.

जेवण बनविणार 5 स्टार हॉटेलचे शेफ
मिळालेल्या माहितीनुसार 1 फेब्रुवारी रोजी सादर होणारा केंद्रीय अर्थसंकल्प ((Union Budget) दरम्यान, भारत पर्यटन विकास निगमच्यावतीने (India Tourism Development Corporation) खासदारांना भोजन दिले जाणार आहे. हे जेवण 5 स्टार अशोक हॉटेलचे स्वयंपाकी करणार आहेत. या जेवणावर सबसिडी मिळणार आहे. त्यामुळे 5 स्टार हॉटेलचे दर लागणार नाहीत. पंचतारांकित जेवण संसदेतील कँटीगप्रमाणे स्वस्त किमतीत उपलब्ध होणार आहे. त्यामुळे आता संसदेच्या कॅन्टीनमध्ये स्वस्तात फाईव्ह स्टार हॉटेलच्या जेवणाचा खासदारांना आनंद घेता येणार आहे.

खासदारांना या दरात मिळणार थालीखासदारांसाठी शाकाहारी थाळीची (vegetarian platter) किंमत 100 रुपये आहे. कढई पनीर, मिक्स व्हेज ड्राई, भाजी, डाळ, मटर पुलाव, चपाती, काकडी, पुदीना रायता, पापड आणि काला जामtन यांचा समावेश आहे. तर मिनी शाकाहारी थाळी रुपये 50 असणार आहे. यात मिक्स व्हेज, सुखी, भाजी, डाळ सुलतानी, जीरा पुलाव, चपाती, सलडा, काकड़ी, पुदीना रायता आणि पापड यांचा समावेश असेल.

नाश्ता काय मिळणार?
जेवणाशिवाय संसदेत नाश्ता देखील दिला जाणार आहे. यामध्ये १३ पदार्थांचा समावेश असणार आहे. त्यात नाश्त्याचे सात प्रकार सोडले तर इतर शाकाहारी भोजनाचा समावेश असणार आहे. यामध्ये देखील छोटी आणि मोठी अशा दोन थाळ्यांचा समावेश असणार असून २५ रुपयात उपमा तर ५० रुपयात पनीर पकोडा, १० रुपयात समोसा किंवा कचोरी या पदार्थांचा समावेश असणार आहे.