यंदाची रणजी करंडक स्पर्धा रद्द; ८७ वर्षांची परंपरा खंडित

0
868
  • विजय हजारे ट्रॉफी स्पर्धा घेण्याचा निर्णय

भारतीय क्रिकेट नियामक बोर्डाने (बीसीसीआय) देशातील सर्वात मोठी स्पर्धा असलेली रणजी ट्रॉफी स्पर्धा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. बीसीसीआयचे सचिव सचिन जय शहा यांनी पत्राद्वारे याबाबतची माहिती सर्व राज्य संघटनांना कवली आहे. रणजी ट्रॉफीच्या दरम्यान मॅच फीसच्या रुपात दररोज ४५ जार रुपये कमावणाऱ्या खेळाडूंना नुकसान भरपाई देण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे.

कोणती स्पर्धा होणार?

सय्यद मुश्ताक अली T20 स्पर्धा सध्या सुरु आहे. ही स्पर्धा झाल्यानंतर विजय हजारे ट्रॉफी (Vijay Hazare Trophy) स्पर्धा घेण्याचा निर्णय BCCI नं घेतला आहे. रणजी ट्रॉफी स्पर्धेत चार दिवसांच्या लढती असतात. विजय हजारे ट्रॉफीमंध्ये एक दिवसांच्या लढती असतात.

म्हणून रद्द केली मोठी रणजी ट्रॉफी स्पर्धा
भारतीय क्रिकेटपटू घडवणारी सर्वात मोठी स्पर्धा असलेली रणजी ट्रॉफी स्पर्धा घेण्यासाठी BCCI कडे पुरेसा वेळ नसल्याचे सांगण्यात येत आहे. तब्बल ८७ वर्षानंतर पहिल्यांदाच रणजी ट्रॉफी स्पर्धा रद्द करण्यात आली आहे. इंडियन प्रीमियर लीग (IPL) मार्च महिन्याच्या शेवटी सुरु होण्याची शक्यता असल्याने या स्पर्धेतील खेळाडूंना आयपीएलसाठी हजर राहवं लागणार आहे. दरम्यान रणजी ट्रॉफी आणि विजय हजारे ट्रॉफीमधील कोणती स्पर्धा खेळवायची याबाबत BCCI मध्ये संभ्रम असल्याने BCCI ने सर्व राज्य संघटनांना पत्र लिहून त्यांचे मत विचारले. त्यावेळी बहुतेक संघटनांनी विजय हजारे ट्रॉफी खेळवण्यास पसंती दिली. असे असताना BCCI चे अध्यक्ष सौरव गांगुली मात्र रणजी ट्रॉफी खेळवण्याच्या बाजूने होते.

मुश्ताक अली स्पर्धेच्या धर्तीवर देशातील सहा मुख्य शहरांमध्ये विजय हजारे स्पर्धा देखील खेळवली जाणार आहे. पुढच्या आठवड्यात या स्पर्धेचं वेळापत्रक अंतिम करण्यात येईल. त्यानंतर खेळाडू बायो-बबलमध्ये प्रवेश करणार असल्याचेही सांगितले जात आहे. एक महिना चालणाऱ्या या स्पर्धेत विजय हजारेसह महिलांच्या वरीष्ठ गटातील वन-डे स्पर्धा खेळवण्याचा निर्णय देखील BCCI ने घेतला आहे.