Budget 2021: अर्थसंकल्पामध्ये कोणत्या क्षेत्राला किती कोटींचा निधी?

0
272

अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज देशाचा अर्थसंकल्प सादर केला. त्यासोबत अर्थमंत्र्यांनी सर्वच क्षेत्रासाठी कोट्यवधी रुपयांच्या बजेटची घोषणा केली आहे. आरोग्य क्षेत्रापासून संरक्षण क्षेत्रापर्यंत तसेच कृषी क्षेत्रासाठीही बजेटची घोषणा करण्यात आली. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी कोणत्या क्षेत्रासाठी किती कोटी रुपयांच्या बजेटचे वाटप केलं ते खालील मुद्द्याच्या आधारे जाणून घेऊयात:

  • कोरोना कालावधीत सरकारने आरोग्य आणि आरोग्य सेवा क्षेत्राला मोठी मदत जाहीर केली आहे. आरोग्य क्षेत्राचे बजेट 94 हजार कोटी रुपयांवरून 2.38 लाख कोटी रुपये करण्यात आले आहे. या माध्यमातून देशातील सर्व लोकांना उत्तम आरोग्य सुविधा देण्यात येणार आहेत.
  • या बजेटमध्ये कोरोना लसीकरणासाठी 35,000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. गरज भासल्यास सरकारकडून निधीही पुरविला जाईल.
  • स्वावलंबी आरोग्य योजनेसाठी 64 कोटींचे बजेट मंजूर झाले आहे.
  • स्वच्छ भारत मिशनसाठी 1.41 लाख कोटी रुपयांचे बजेट देण्यात आले आहे.
  • यावेळी सरकारने रेल्वेसाठी 1.07 लाख कोटी रुपयांचे बजेट जाहीर केले आहे.
  • रस्त्यांसाठी 2021-22 च्या अर्थसंकल्पात अर्थमंत्र्यांनी 1.18 कोटी बजेट जाहीर केले. या अर्थसंकल्पातून देशातील रस्ते अधिक सुकर केले जातील.
  • देशातील सार्वजनिक बस परिवहन सेवा वाढविण्यासाठी 18,000 कोटी रुपये खर्च करुन नवीन योजना सुरू केली जाईल.
  • विमा कंपन्यांमध्ये एफडीआय 49% वरून 74% पर्यंत वाढवण्याची तरतूद करण्यात आली आहे.
  • जल जीवन मोहिमेसाठी 2.87 लाख कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
  • वायू प्रदूषण रोखण्यासाठी 2.21 कोटी बजेट देण्यात आले आहे.
  • सरकारी बँकांसाठी 20 हजार कोटी रुपयांची व्यवस्था करण्यात आली आहे.
  • येत्या काळात विधानसभा निवडणूक असणाऱ्या राज्यांसाठी अर्थमंत्र्यांनी मोठी रक्कम दिली आहे.
  • अर्थमंत्र्यांनी पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ आणि आसामसाठी मोठी तरतूद केली आहे.
  • निवडणुका असलेल्या मोठ्या राज्यांमध्ये रस्त्यांच्या पायाभूत सुविधांसाठी एकूण 2.27 लाख कोटी रुपयांची घोषणा करण्यात आली आहे.
  • एमएसपी उत्पादन खर्चाच्या 1.5 पट वाढ करण्यात आली आहे.
  • आदिवासी भागातील शाळांना 38 कोटी रुपये देण्यात आले आहेत.