Royal Enfield ची बुलेट ही कित्येक तरुणांची जीव की प्राण असते. कित्येक तरुणांचं Royal Enfield ची बुलेट घेण्याचं स्वप्न असतं. अशाच काही तरुणांसाठी आम्ही एक आनंदाची बातमी घेऊन आलो आहोत. सर्वात चांगली गोष्ट म्हणजे Royal Enfield एक नाही दोन नाही तर चार बुलेट्स बाजारात लवकरच लाँच करणार आहे. Royal Enfield चे भारतात ज्याप्रमाणे नावलौकिक आहे तसे इतर बाईक्स कंपन्याच्या तुलनेने कमीच आहे. आता जर तुम्ही बुलेट्स खरेदी करण्याच्या विचारात असाल तर थोडं धीर धरा… कारण लवकरच बाजारात Royal Enfield च्या चार नव्या कोऱ्या बुलेट्स दाखल होणार आहेत.
रॉयल एनफील्ड इंटरसेप्टर 350
कंपनी सध्या इंटरसेप्टर 350 वर्जनवर काम करत आहे. नव्या वर्जनच्या चाचणीचा फोटो नुकताच समोर आला होता. या मॉडेलमध्ये ट्विन एग्जॉस्टच्या ऐवजी सिंगल साइड-माउंटेड एग्जॉस्ट देण्यात आलं आहे. याशिवाय बरेच फिचर्स इंटरसेप्टर 650 सारखे असणार आहेत. ही बाईक मे २०२१ मध्ये लाँच होणार असून या बाईकची किंमत १.७० लाख असल्याचे सांगितले जात आहे.
रॉयल एन्फील्ड क्लासिक ३५० (Royal Enfield Classic 350)
सर्वाधिक चर्चेत असलेली रॉयल एन्फील्ड क्लासिक ३५० या बाईकचे नवे मॉडेल लवकरच लाँच करण्यात येणार आहे. नव्या तंत्रज्ञानावर आधारलेली ही बाईक आधीच्या मॉडेल पेक्षा अधिक चांगली असल्याचे सांगितले जात आहे. ही बाईक फेब्रुवारी २०२१ मध्ये लाँच होणार असून या बाईकची किंमत १.७० लाख असल्याचे सांगितले जात आहे.
रॉयल एन्फील्ड क्रूझर ६५०
या गाडीची भारतीय चाहत्यांना मागील काही काळापासून प्रतीक्षा आहे. 2019 मध्ये इटलीतील EICMA Motor Show मध्ये प्रदर्शित केली होती. या गाडीत सर्क्युलर हेड लॅम्प, सिलिंडर आकाराचा फ्युल टॅंक आणि फिनिश्ड अलॉय व्हील्स मिळणार आहेत. त्याशिवाय याचं इंजिन 650cc चं असणार असून RE 650 twins च्या धर्तीवर याचं डिझाईन केलं आहे.
रॉयल एन्फील्ड इंटरसेप्टर (Royal Enfield Interceptor 650)
रॉयल एन्फील्ड ही बाईक ६५० सीसी इंजिनची असून ही बाईक ३५० सीसीच्या इंजिनमध्ये उपलब्ध होणार आहे. त्यामुळे या बाईकचे नाव रॉयल एन्फील्ड इंटरसेप्टर ३५० असे दिले असावे. ही बाईक सिंगल एग्सॉस्ट सिस्टमसह लाँच करण्यात येणार आहे.