उत्तराखंड दुर्घटना :ग्लेशियर बर्स्ट म्हणजे काय ? आऊटबर्स्ट फ्लडची स्थिती कशी निर्माण होते ?

0
281

उत्तराखंडच्या जोशीमठाच्या रेणी भागातील ऋषिगंगा ऊर्जा प्रकल्पाजवळ हिमनदी फुटल्यानं आज मोठी दुर्घटना घडलीय. चमोली जिल्ह्याच्या तपोवन भागात रविवारी सकाळी घडलेल्या या घटनेनं स्थानिक प्रशासनाला मोठा धक्का बसला आहे. हिमनदी कोसळत खाली आल्यानं पाण्याच्या प्रवाहात प्रचंड वाढ होऊन जिल्ह्यातील ऋषिगंगा ऊर्जा प्रकल्पाचा बांध फुटला आणि धौलगंगा नदीच्या पाण्याची पातळी अचानक वाढली. त्यामुळे या भागात पूरसदृश्यं परिस्थिती निर्माण झाली. याचा फटका पाण्याच्या प्रवाहाजवळ असलेल्या गावांनाही बसला. या ठिकाणी काम करणारे जवळपास १०० ते १५० मजूर दुर्घटनेनंतर बेपत्ता झाले आहेत.

धौलगंगा नदीनं धारण केलेलं रौद्र रुप पाहून प्रशासनाची एकच धावपळ उडाली. त्यानंतर ताबडतोब देवप्रयाग, कर्णप्रयाग, श्रीनगर, ऋषिकेष, अलकनंदा यांसहीत इतर भागांना सतर्कतेचे आदेश देण्यात आले. अलकनंदाकडे न जाण्याचे आदेश नागरिकांना देण्यात आले आहेत. ही घटना बद्रीनाथ आणि तपोवन दरम्यान घडलीय. हिमनदीच्या बर्फाचे तुकडे धौलगंगा नदीत वाहताना दिसत आहेत.

ग्लेशियर म्हणजे काय ? किती प्रकारचे आहेत?
ग्लेशियर म्हणजे बर्फ एका जागी जमा झाल्यामुळे होणारी परिस्थिती. या ग्लेशियरचे दोन प्रकार आहेत. पहिला प्रकार म्हणजे अल्पाइन आणि दुसरा प्रकार म्हणजे आइस शीट्स. जो ग्लेशियर पर्वतावर असतो त्याला अल्पाइन श्रेणीतला ग्लेशियर म्हणून संबोधले जाते. ग्लेशियर कोसळण्यासाठी कोणतही एकच कारण नसते. अनेक कारणामुळे हे ग्लेशियर कोसळण्याच्या घटना घडतात. गुरूत्वाकर्षण आणि ग्लेशियरच्या किनाऱ्यावर तणाव निर्माण झाल्याने हे कोसळण्याच्या घटना घडतात.

जागतिक पातळीवरचा सध्याचा मोठा विषय म्हणजे ग्लोबल वॉर्मिंगने बर्फ वितळण्याच्या घटना घडतात. त्यामुळे ग्लेशियरचा एक तुकडा वेगळा होऊन अशा घटना घडतात. ग्लेशियरच्या बर्फाचा तुकडा वेगळा होतो तेव्हा त्याला काल्विंग असे म्हणतात. उत्तराखंड येथे घडलेल्या घटनेत ग्लेशियर कोसळण्याचे अजुनही कोणतेच नेमके कारण समोर आलेले नाही.

ग्लेशियर’मुळे पूर येणाची काय कारणे आहेत ?
ग्लेशियर तुटून पूर येण्याची घटना खूपच भयावह अशी असते. असे मानले जाते की पूराची परिस्थिती तेव्हाच उद्भवते जेव्हा ग्लेशियरच्या दरम्यान ड्रेनेज ब्लॉक होतात. त्यानंतर पाण्याचा विसर्ग होऊन हे पाणी आपला रस्ता तयार करते. जेव्हा पाणी मोठ्या प्रमाणात ग्लेशियरच्या दरम्यान वाहते तेव्हा बर्फ विरघळण्याची प्रक्रिया वेगाने वाढते. ग्लेशियरचा बर्फ अनेकदा हळू हळू विरघळतो. पण अनेकदा तडे गेल्याने बर्फ वितळण्याचा वेग वाढतो. त्यामुळेच हळूवार बर्फ वितळण्याच्या प्रक्रियेला वेग येतो. त्यामुळे पाण्याच्या प्रवाहातही वेग येऊ लागतो. या घटनेलाच आऊटबर्स्ट फ्लड असे म्हणतात. सामान्यपणे पर्वताच्या परिसरात अशी परिस्थिती दिसून येते