IND vs ENG : पहिला मान इंग्लंडचा; टीम इंडियाचा 227 धावांनी पराभव

0
172

भारताविरुद्धच्या पहिल्या कसोटीत इग्लंडने भारताला २२७ धावांनी पराभव करत मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. पहिल्या दिवसापासून इग्लंडची सामन्यावर पकड होती. पहिल्या तीन दिवस फलंदाजीसाठी अनुकूल असलेली चेन्नईची खेळपट्टीवर शेवटच्या २ दिवस गोलंदाजांनी गाजवले. इंग्लंडने भारताला ४२० धावांचे आव्हान दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना भारताचा डाव १९२ धावांवर आटोपला. कर्णधार विराट कोहलीने एकाकी झुंज देत सामना अनिर्णित राखण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याचे प्रयत्न तोकडे पडले. इग्लंडकडून दुसऱ्या डावात जेम्स अँडरसने ३ तर जॅक लीचने ४ गडी बाद करत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.

चेन्नई कसोटीत लाजिरवाना पराभव पत्करावा लागला आहे. भारताने पहिला कसोटी सामना 227 धावांनी गमावला. 420 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताचा संपूर्ण संघ 192 धावांवर बाद झाला. कर्णधार कोहलीने भारताकडून सर्वाधिक 72 धावा केल्या. शुभमन गिल 50 धावा केल्या. इंग्लंडकडून जॅक लीचने 4, जेम्स अँडरसनने 3, बेन स्टोक्स, जोफ्रा आर्चर आणि डॉम बाईसने प्रत्येकी 1-1 विकेट घेतली.

अश्विनची कमाल गोलंदाजी

पहिल्या डावात 578 धावांचा डोंगर उभारणाऱ्या इंग्लंडला दुसऱ्या डावात रोखण्यात टीम इंडियाला यश आलं होतं. मात्र अश्विनच्या गोलंदाजीच्या जोरावर इंग्लंडच्या संघाला टीम इंडियाने 178 धावांवर रोखलं. अश्विननं रोरी बर्न्स, डॉमनिक सिब्ले, बेन स्टोक्स, जोफ्रा आर्चर आणि जेम्स अँडरसन यांना बाद केलं. कसोटी क्रिकेटच्या कारकिर्दीत त्यानं 28व्या वेळेस पाचपेक्षाही जास्त गडी बाद करण्याची कमाल केली. शिवाय कसोटी क्रिकेटच्या एकाच डावात सर्वाधिक पाच गडी बाद करणारा तो जगातील आठवा गोलंदाज ठरला आहे.

चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर भारतीय संघाला तब्बल २२ वर्षांनंतर पराभव पत्करावा लागला आहे. गेल्या २२ वर्षात भारतीय संघाला चेन्नईमध्ये कसोटी सामन्यात एकही पराभव पत्करावा लागला नव्हता. भारताला यापूर्वी चेन्नईमध्ये १९९९ साली पराभव पत्करावा लागला होता. त्यानंतर भारतीय संघ चेन्नईमध्ये अपराजित राहिला होता. पण या पराभवानंतर भारताची ही विजयी मालिका खंडीत झाल्याचे पाहायला मिळत आहे.

दोन्ही संघातील दुसरा कसोटी सामना चेन्नईतील याच मैदानावर १३ फेब्रुवारीपासून सूरू होणार आहे. हा दुसरा कसोटी सामना जिंकून भारतीय संघ मालिकेत १-१ अशी बरोबर करतो का, याकडे संपूर्ण क्रिकेट विश्वाचे लक्ष असेल.

सामना संक्षिप्त स्वरूपात…
इंग्लंड पहिला डाव– सर्वबाद ५७८ (जो रूट – २१८; बुमराह- ८४/ ३)

भारत पहिला डाव– सर्वबाद ३३७ (ऋषभ पंत – ९१; डॉम बेस- ७६ / ४)

इंग्लंड दुसरा डाव– सर्वबाद १७८ (जो रूट- ४०; अश्विन- ६१ / ६)

भारत दुसरा डाव– सर्वबाद १९२ (विराट कोहली- ७२; जॅक लीच- ७६/४)

इंग्लंडचा संघ २२७ धावांनी विजयी