वाडा गावच्या उपसरपंच पदी गणेश सोपान लांडगे यांची बिनविरोध निवड

0
526

वाडा गावाच्या रिक्त उपसरपंच पदी ग्रामपंचायत सरपंच व सदस्य यांच्या सर्वानुमते श्री गणेश सोपान लांडगे यांची नियुक्ती करण्यात आली. वाडा गावच्या सर्व नागरिकांच्या वतीने त्यांचे अभिनंदन करण्यात आले. एकही उमेदवारी अर्ज न आल्यामुळे त्यांची उमेदवारी बिनविरोध ठरली. वाडा गावचे विद्यमान पोलीस पाटील यांच्या हस्ते त्यांचा शाल, हार व नारळ पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून श्री म्हस्के भाऊसाहेब यांनी कामकाज पाहिले.

विद्यमान उपसरपंच ज्ञानदेव सुरकुले यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यामुळे उपसरपंच कोण होणार अशी चर्चा सुरु होती. अशातच गणेश लांडगे यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्यामुळे निवडणूक प्रक्रियेनुसार वाडा गावच्या उपसरपंचपदी युवा नेतृत्व गणेश लांडगे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी मावळते उपसरपंच ज्ञानदेव सुरकुले, ग्रामपंचायत सदस्य किरण हुंडारे,अनिल केदारी, कुमुदिनी केदारी,शिल्पा घनवट,राधिका सुपे,दत्तात्रय भालेराव,सुरेखा कहाणे आणि पोलीस पाटील दीपक पावडे उपस्थित होते