अवघ्या २३ व्या वर्षांची मानसा वाराणसी ठरली ‘मिस इंडिया’ २०२०

0
203

दरवर्षी फेमिना मिस इंडियाची सगळ्यांनाच उत्सुकता असते. यावर्षी देखील हा सोहळा ऑनलाईन पद्धतीन पार पडला.मिस इंडियाचे हे ५७ वे पर्व होते.मिस इंडिया ब्युटी कॉन्टेस्टफेमिना मिस इंडिया २०२०चा ग्रॅंड फिनाले १० फेब्रुवारीला मुंबईतील हयात रिजेंसी हॉटेलमध्ये संपन्न झाला. यामध्ये २०२०ची विजेती मानसा वाराणसी ठरली आहे.तसेच हरियाणाची मणिका शोकंद मिस ग्रॅंड इंडिया २०२० ठरली आणि उत्तरप्रदेशची मान्या सिंह ही मिस इंडिया २०२०ची रनरअप ठरली आहे. अंतिम सोहळ्यात वाणी कपूर, चित्रागंदा सिंह, नेहा धूपिया, पुलिकित सम्राट आणि अपारशक्ती खुराना हे सेलिब्रिटी उपस्थित होते. यांच्या उपस्थितीत मानसा वाराणसी हिला फेमिना मिस 2020 चा मुकूट घालण्यात आला.

कोण आहे मानसा वाराणसी?

मानसा अवघी 23 वर्षांची असून ते हैद्राबादची रहिवासी आहे. यापूर्वी तिने मिस तेलंगना किताब देखील पटकावला होता. मानसाने इंजिनियरचे शिक्षण घेतले असून ती FIX सर्टिफिकेशन इंजिनियर म्हणून काम करते. तिला वाचन, नृत्य आणि संगीताची प्रचंड आवड आहे. मानसा वाराणसी ही फायनान्शिअल इन्फॉर्मेशन एक्सचेंज अ‍ॅनालिस्ट आहे. दरम्यान मानसा यंदा डिसेंबर 2021 मध्ये होणार्‍या 70 व्या मिस वर्ल्ड स्पर्धेमध्ये भारताचं प्रतिनिधित्त्व करणार आहे. मानसाने आपल्या आवडीनिवडीबद्दल विचारलं असतं, ती म्हणाली मला लहान मुलांपर्यंत पोहोचायचंय. त्यांना सुरक्षित असल्याची भावना अनुभवू द्यायची आहे. कारण शारीरिक स्वास्थासोबतच मानसिक स्वास्थ देखील महत्वाचं आहे.