बीसीसीआयच्या नव्या फिटनेस टेस्टमध्ये ‘हे’ सहा खेळाडू नापास

0
410

भारतीय संघातील खेळाडूंच्या फिटनेससंदर्भात बीसीसीआयची नवी फिटनेस टेस्ट पुन्हा चर्चेत आले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार देशातील सहा क्रिकेटपटू ही टेस्ट पूर्ण करण्यात अपयशी ठरले आहेत. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात भारतासाठी खेळाडूंच्या दुखापती हा चिंतेचा मुद्दा ठरला. भारतीय चमूतील सुमारे १० खेळाडू दुखापतग्रस्त झाल्याचं दिसून आले. प्रत्येकाच्या दुखापतीचे कारण वेगवेगळे असले तरी BCCIने या गोष्टीची गंभीर दखल घेतली. त्यामुळेच खेळाडूंच्या तंदुरूस्तीबाबत अधिक सतर्क राहण्याच्या दृष्टीने BCCIने खेळाडूंची Time Trial Test घेणार असल्याचं स्पष्ट केलं होतं. त्यानुसार भारत-इंग्लंड टी-२० व वन डे मालिकांआधी काही खेळाडूंची ही टेस्ट घेण्यात आली. त्यात नवोदित खेळाडू संजू सॅमसनसह सहा खेळाडू नापास झाले.

खेळाडुंना दोन किमी धावणं देखील अशक्य होतं. जयदेव उनाडकत, इशान किशन, सिद्धार्थ कौल, संजू सॅमसन, नितीश राणा आणि राहुल तेवातिया हे खेळाडू चाचणीत नापास झाले आहेत. या सहाही खेळाडूंची पुन्हा चाचणी होणार आहे.

बीसीसीआयनं खेळांडूंची फिटनेस तपासण्यासाठी ही नवी चाचणी घेतली. त्यात हे सहा खेळाडू नापास झाले. बंगळुरूमध्ये ही टेस्ट घेतलेली. पुन्हा एक संधी त्यांना दिली जाणारय. जर त्यातही हे खेळाडून नापास झाले तर त्यांना पाच टी ट्वेटी आणि तीन एकदिवसीय सामन्यांच्या सिरीजमध्ये संधी मिळणार नाहीये.

बीसीसीआयने या आठवड्यात बेंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमी येथे फिटनेस टेस्टचे आयोजन केले होते. टाइम्स ऑफ इंडियाला बीसीसीआयमधील एका सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, ही एक नवी फिटनेस टेस्ट असल्याने सर्वांना काही वेळ दिला गेला आहे. जेणेकरून ते पुन्हा एकदा टेस्ट देऊ शकतील. पण जर यावेळी ते टेस्ट पूर्ण करण्यात अपयशी ठरले तर इंग्लंडविरुद्ध होणाऱ्या आगामी टी-२० सामन्यांच्या मालिकेसाठी निवड होण्याची शक्यता कमी आहे.