अखेर प्रतीक्षा संपली: बहुचर्चित ’83’ चित्रपट या तारखेला रिलीज होणार!

0
184

कोरोनाचा संसर्ग होऊ नये, यासाठी मार्चमध्ये चित्रपटगृहे बंद करण्यात आली होती. ज्यामुळे अनेक चित्रपटांची रिलीज तारीख पुढे ढकलण्यात आल्या होत्या. बिग बजेटच्या चित्रपटांना यामुळे फटका बसला आहे. आता चित्रपटगृहे पुर्ण क्षमतेसह उघडली आहेत. त्यानंतर, निर्मात्यांनी त्यांचा मोठा बजेटचे चित्रपट रिलीज करण्याची तयारी सुरू केली आहे.

दरम्यान ’83’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहिर करण्यात आली आहे. ’83’ हा चित्रपट ४ जून २०२१ रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. अभिनेता रणवीर सिंगने इन्स्टाग्राम अकाऊंटवर चित्रपटाचे पोस्टर शेअर करत चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख सांगितली आहे. ’83 चित्रपट ४ जून २०२१ रोजी हिंदी, तामिळ, तेलुगू, कन्नड आणि मल्याळम या भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. लवकरच चित्रपटगृहांमध्ये भेटूया’ या आशयाचे कॅप्शन रणवीरने पोस्टर शेअर करत दिले आहे.

दरम्यान, 1983च्या क्रिकेट विश्वकपच्या अंतिम सामन्या वेस्ट इंडिजच्या विरूद्ध भारताने दणदणीत विजय मिळवून विश्वचषकावर आपलं नाव कोरलं होतं. याच गोष्टीवर आगामी ’83’ हा चित्रपट आहे. यामध्ये रणवीर सिंह माजी कर्णधार कपिल देव यांच्या भूमिकेत झळकणार आहे. तर अभिनेत्री दीपिका पादुकोण कपिल देव यांची पत्नीच्या भूमिकेत दिसणार आहे. लग्नानंतर पहिल्यांदाच रणवीर आणि दीपिका स्क्रिन शेअर करणार आहेत.

कपिल देवच्या पत्नीची भूमिका दीपिका पादुकोण साकारत आहे. पहिल्यांदाच दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग एका चित्रपटात दिसणार आहेत. यामुळे चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहात आहेत. एका मुलाखतीदरम्यान रणवीर कपूरने सांगितले होते की, माझ्या लहानपणापासूनच मला क्रिकेटची क्रेझ सुरू होती. दिग्दर्शक कबीर खान माझ्याकडे आले आणि म्हणाले की, ते 83 वर एक चित्रपट बनवणार आहे आणि मला चित्रपटाची कहाणी आवडली आणि मी लगेचच होकार दिला.

२५ जून १९८३ रोजी लंडनमधील लॉर्ड्सच्या मैदानावर भारतीय संघाने क्रिकेट विश्वचषक जिंकला होता. याच विजयगाथेवर आधारित ’83’ हा चित्रपट आहे. या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा चित्रपट दिग्दर्शक कबीर खान सांभाळत आहे. चित्रपटाच्या टीममध्ये रणवीर सिंग, एमी विर्क, चिराग पाटील ,साकीब सलीम ,ताहिर भसीन ,जतिन सरना ,जीवा, आदिनाथ कोठारे, साहिल खट्टर,पंकज त्रिपाठी हे कलाकार मुख्य भूमिकेत झळकणार आहेत. तसेच अभिनेत्री दीपिका पादूकोण कपिल देव यांच्या पत्नी रोमी यांच्या भूमिकेत दिसणार आहे.