Moto E7 Power : मोटोरोलाचा स्वस्त फोन भारतात झाला लाँच

0
192

मोटोरोला (Motorola) कंपनीने भारतात नवा स्मार्टफोन Moto E7 Power लाँच केला आहे. 5000mAh ची बॅटरी असलेला मोटोरोलाचा सर्वात स्वस्त स्मार्टफोन भारतात लाँच झाला आहे. या स्मार्टफोनची किंमत 7,499 रुपये इतकी आहे. या स्मार्टफोनमध्ये 4GB RAM+64GB चे स्टोरेज असणार आहे ज्याची किंमत 8,299 रुपये इतकी आहे. या स्मार्टफोनचा पहिला सेल 26 फेब्रुवारीला दुपारी 12 वाजता फ्लिपकार्टवर (Flipkart) होणार आहे.

Moto E7 Power स्मार्टफोनच्या डिस्प्लेविषयी बोलायचे झाले तर, यात 6.5 इंचाची HD+ डिस्प्ले दिली आहे. या फोनमध्ये MediaTek Helio G25 प्रोसेसर देण्यात आला आहे. हा स्मार्टफोन दोन रंगात उपलब्ध करण्यात आला आहे. Tahiti Blue आणि Coral Red अशा दोन रंगात हा स्मार्टफोन उपलब्ध आहे

Moto E7 Power स्पेसिफिकेशन्स :-
Moto E7 Power मध्ये अँड्रॉइड 10 चा सपोर्ट असून फोनमध्ये 6.5 इंचाचा HD+ मॅक्स व्हिजन डिस्प्ले आहे. फोनमध्ये मीडियाटेक हीलियो G25 प्रोसेसर, 4 जीबीपर्यंत रॅम आणि 64 जीबीपर्यंत स्टोरेज आहे. याशिवाय फोनमध्ये ड्युअल रिअर कॅमेरा सेटअप आहे. यातील मुख्य कॅमेरा 13 मेगापिक्सेलचा तर दुसरा 2 मेगापिक्सेलचा मॅक्रो सेन्सर आहे. तसेच पुढील बाजूला 5 मेगापिक्सेलचा सेल्फी कॅमेराही आहे. कॅमेरासाठी पोट्रेट, पॅनोरमा, फेस ब्युटी असे अनेक मोड्स देण्यात आले आहेत. कनेक्टिव्हिटीसाठी फोनमध्ये 4G VoLTE, Wi-Fi 802.11 b/g/n, ब्लूटूथ 5.0, GPS/A-GPS, FM रेडिओ, युएसबी टाइप-सी पोर्ट आणि 3.5एमएम हेडफोन जॅक मिळेल. फोनच्या मागील बाजूला फिंगरप्रिंट सेन्सर आहे. यात फास्ट चार्जिंगचा सपोर्ट असलेली 5000mAh क्षमतेची बॅटरी आहे. ही बॅटरी 14 तासांचा व्हिडिओ प्ले बॅकअप देते असा कंपनीचा दावा आहे.