कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात अनेक ठिकाणी संचारबंदी, नवे हॉटस्पॉट, नवे निर्बंध

0
185

राज्यात कोरोना रुग्णांचं प्रमाण दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील काही शहरांमध्ये पुन्हा कडक निर्बंध लादण्यात आले आहेत. राज्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेशी संवाद साधून योग्य ती खबरदारी घेण्याचं आवाहन केल. तसेच सर्व राजकीय, शासकीय, धार्मिक आणि सामाजिक कार्यक्रमांना काही दिवस बंदी घालण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं.

यवतमाळवरमध्ये नव्याने निर्बंध लागू

यवतमाळमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढायला लागल्याने जिल्हाधिकारी ही अ‍ॅक्शन मोडमध्ये आले आहेत. कोरोनाचे नियम मोडल्यास गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचा इशाराच त्यांनी दिला आहे. प्रशासनाच्या वतीने करण्यात येणाऱ्या उपाय योजनांची जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी माहिती दिली. कोरोनाचं संकट वेळीच रोखण्यासाठी मास्क आणि सोशल डिस्टन्सिंगचे नियम मोडणाऱ्यांवर पोलिस विभागाच्या मदतीने कडक कारवाईचे संकेत देतानाचा कोव्हिड-19 ची वाढती रुग्णसंख्या नियंत्रणात आणण्यासाठी कॉन्टॅक्ट ट्रेसिंग आणि विलगीकरणावर भर, कोविड 19 रूग्णांची गैरसोय होवू नये यासाठी रुग्णवाहिका आणि कोविड केअर सेंटर्स पूर्ववत करण्याचे नियोजन करणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

पुणे

पुण्यात रात्री 11 ते सकाळी सहापर्यंत पुन्हा संचारबंदी करण्याचा निर्णय घेतला आहे. शाळा, महाविद्यालय, कोचिंग क्लासेस 28 फेब्रुवारीपर्यंत बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मायक्रो कंटेन्मेंट झोन लागू करण्याचा विचार असून त्याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येत आहे. विवाह सोहळ्यास किंवा समारंभास होणारी गर्दी लक्षात घेता, यावरही कडक निर्बंध लावण्याचा निर्णय घेण्यात आला असून लग्न, समारंभास मोजक्याच जणांची उपस्थिती आणि मास्क वापरावा लागेल, अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. शहरातील हॉटेल्स, रेस्टॉरंट रात्री 11 वाजेपर्यंत मर्यादित.

नाशिक

नाशिकमध्ये आजपासून रात्री 11 ते पहाटे 5 या वेळेत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. मास्क न वापरल्यास 1 हजार रुपयांचा दंड आकारण्यात येईल. तसेच आठ दिवसांत स्थिती नियंत्रणात आली नाही तर कडक निर्णय घ्यावे लागतील, असंही छगन भुजबळ यांनी सांगितलं.

नागपूर

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता आता नागपुरात देखील निर्बंध लागू होत आहेत. नागपुरात कडक नियमावली लागू करणार असल्याचं मंत्री नितीन राऊत यांनी म्हटलं आहे. महत्त्वाचं म्हणजे 7 मार्चपर्यंत नागपुरातील आठवडी बाजार बंद राहणार आहेत. शाळा, कॉलेज,कोचिंग क्लासेस 7 मार्चपर्यंत पूर्णपणे बंद राहतील. तर हॉटेल रात्री 9 नंतर बंद राहणार असून फक्त 50 टक्के लोकांनाच परवानगी देण्यात येणार आहे.

नांदेड

शहरात पाचवी ते आठवी पर्यंतच्या शाळा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोनाचा नवीन विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांनी मास्क, सॅनिटायजर आणि योग्य अंतर या त्रिसूत्री नियमांची अंमलबजावणी काटेकोरपणे करावी असं आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केलंय.

अमरावती विभाग

अकोला, अमरावती, यवतमाळ, बुलडाणा, वाशिम जिल्ह्यात निर्बंध लागू करण्यात आले आहेत. सर्व प्रकारची दुकाने/आस्थापना सकाळी 9 ते सायंकाळी 5 पर्यंत सुरू राहतील. सर्व प्रकारची उपहारगृहे हॉटेल्स प्रत्यक्ष सुरू न ठेवता फक्त पार्सल सुविधेत परवानगी राहील. लग्नसमारंभकरिता 25 व्यक्तींना वधू-वरासह परवानगी राहील. जिल्हा बस वाहतूक करताना बसमधील असलेल्या एकूण प्रवासी श्रमतेच्या 50 टक्के प्रवासी वाहतुकीकरिता परवानगी राहील. सर्व प्रकारची शाळा, महाविद्यालय, शैक्षणिक प्रशिक्षण केंद्रे, खाजगी शिकवणी वर्ग, कोचिंग क्लासेस हे बंद राहतील. सिनेमागृहे, व्यायाम शाळा, जलतरण तलाव, मनोरंजन, उद्याने, नाट्यगृहे संबंधित ठिकाणे ही बंद राहतील.