१ मार्चपासून ज्येष्ठ नागरिकांना कोरोना लस;सरकारी केंद्रांवर मोफत तर खासगी केंद्रांवर पैसे मोजावे लागणार

0
306

कोरोना लसीकरणासंदर्भात केंद्र सरकारने मोठी घोषणा केली आहे. देशभरात 16 जानेवारीपासून कोरोना लसीकरण अभियानाला सुरुवात झाली. पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचाऱ्यांचं लसीकरण झाल्यानंतर दुसऱ्या टप्प्यात पोलीस आणि शिक्षकांचं लसीकरण पार पडलं. आता 1 मार्चपासून कोरोना लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्याला सुरुवात होईल. या टप्प्यात 60 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिक आणि गंभीर आजार असलेले 45 वर्षांवरील नागरिकांना कोरोनाची लस देण्यास प्राधान्य देण्यात येईल.

१० हजार सरकारी आणि २० हजार खासगी केंद्रांवर ही लसीकरण मोहीम पार पडणार आहे. तसंच ही लस मोफत दिली जाणार असून सर्व खर्च केंद्र सरकार उचलणार,” असल्याचंही प्रकाश जावडेकर यांनी सांगितलं आहे. प्रकाश जावडेकर यांनी यावेळी सांगितलं की, “ज्यांना खासगी रुग्णालयातून लसीकरण करुन घ्यायचं आहे त्यांना पैसे भरावे लागतील. यासाठी किती पैसे मोजावे लागतील याचा निर्णय आरोग्य मंत्रालय पुढील तीन ते चार दिवसांत घेईल. आरोग्य मंत्रालयाची यासंबंधी रुग्णालयं आणि लसनिर्मिती करणाऱ्या कंपन्यांसोबत चर्चा सुरु आहे.

सरकार सेल्‍फ रजिस्‍ट्रेशनची सूट देण्याची शक्यता
भारतात 60 वर्षांवरील जास्त वय असणाऱ्या आणि गंभीर आजाराने ग्रस्त असलेल्या नागरिकांना लसीसाठी सेल्फ रजिस्ट्रेशर करण्याची परवानगी मिळू शकते.कोणत्या ठिकाणी लस घ्यायची आहे हे निवडण्याचा पर्यायही त्यांना मिळणार आहे. यासाठी मोबाईल अॅपमध्ये बदल करण्यात आले आहेत. सुरुवातील 50 वर्षांहून अधिक वय असलेल्या नागरिकांनांच परवानगी देणार असल्याचं म्हटलं होतं. पण नंतर ही वयोमर्यादा वाढवून 60 वर्षे करण्यात आली कारण त्यांना धोका अधिक आहे. लसीकरणाचं प्रमाणपत्र Co-WIN अॅप आणि डिजिलॉकर यांसारख्या सरकारी प्‍लॅटफॉर्मवर उपलब्‍ध असेल.