‘अग्गंबाई सासूबाई’नंतर आता ‘अग्गंबाई सूनबाई’ ही नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला

0
221

झी मराठीवरची लोकप्रिय मालिका म्हणजे ‘अग्गंबाई सासूबाई’. यातली पात्रं म्हणजे अभिजीत राजे, आसावरी आणि विशेषतः बबड्या प्रेक्षकांमध्ये बरेच लोकप्रिय झाले आहेत. आजही या मालिकेचा प्रेक्षकवर्ग मोठा आहे. कदाचित हाच विचार करून या मालिकेसारखीच आणि यातलेच कलाकार घेऊन एक नवी मालिका लवकरच येत आहे.

अग्गंबाई सासूबाई’ मालिका बंद होणार असून त्याजागी ‘अग्गंबाई सूनबाई’ ही मालिका दिसणार आहे. या मालिकेतील सर्व पात्रे तिच असून शुभ्राची भूमिकेत तेजश्री प्रधान नसेल. तेजश्रीच्या जागी आता उमा पेंढारकर ही अभिनेत्री दिसणार आहे. उमाने यापूर्वी ‘स्वामिनी’ मालिकेत पार्वतीबाईंची भूमिका साकरली होती.

नुकताच या नव्या मालिकेचा प्रोमो प्रदर्शित झाला आहे. ‘अग्गंबाई सासूबाई’नंतर आता ‘अग्गंबाई सूनबाई’ ही नवी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. याच्या प्रोमोमध्ये दिसतंय की आसावरी म्हणजे अभिनेत्री निवेदिता सराफ एका मिटिंगमध्ये बसलीये आणि अभिजीत राजे अर्थात अभिनेते डॉ. गिरीश ओक त्यांना फोन करून जेवणाबद्दल विचारत आहे.

आता ह्या नव्या मालिकेची कथा काय असेल, सध्या सुरु असलेल्या मालिकेशी त्याचा काही संबंध असेल की फक्त नावातच साम्य आहे, यात अजून कोणकोणते कलाकार पाहायला मिळतील याबद्दल प्रेक्षकांमध्ये उत्सुकता नक्कीच आहे.