अमेरिकेत स्थलांतरितांसाठी असलेल्या ‘ग्रीन कार्ड’वरचे निर्बंध हटवले; भारतीयांना होणार फायदा

0
178

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी अमेरिकेतील भारतीयांसह इतर देशातील नागरिकांना दिलासा दिला आहे. बायडन यांनी माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी करोना काळात ग्रीन कार्ड देण्यास लागू केलेली बंदी हटवली आहे. बायडन यांच्या या निर्णयामुळे भारतीयांना मोठ्या प्रमाणावर फायदा होणार आहे.

गेल्या वर्षी डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेत कामासाठी येणाऱ्या परदेशी नागरिकांना देण्यात येणाऱ्या ग्रीन कार्डवर निर्बंध घातले होते. ते निर्बंध नंतर मार्च 2021 पर्यंत वाढवले होते. अशा प्रकारचे निर्बंध अमेरिकेच्या हिताचे नाहीत, त्यामुळे अमेरिकन अर्थव्यवस्थेचं नुकसान होतंय असं जो बायडेन यांनी सांगितलं. ग्रीन कार्डवरचे निर्बंध हटवताना जो बायडेन यांनी सांगितलं की या निर्बंधामुळे अमेरिकेचे नुकसान होत आहे. यामुळे अमेरिकेत राहत असलेल्या नागरिकांना त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना भेटायला अडचणी होत होत्या. या निर्बंधामुळे अमेरिकन उद्योग जगताचं मोठं नुकसान होत आहे. या ग्रीन कार्डच्या माध्यमातून जगभरातील प्रभावशाली आणि कौशल्य असणारे लोक अमेरिकेत येत असतात.

तत्पूर्वी, बायडेन प्रशासनाने संसदेत अमेरिकन नागरिकत्व विधेयक २०२१ सादर केले. याद्वारे रोजगारावर आधारित ग्रीन कार्डसाठी एखाद्या देशात स्थलांतर करणार्‍यांच्या संख्येवर निर्बंध घालण्यावरील पूर्वीची बंदी हटविली जाईल. कायदा लागू झाल्यानंतर एच -१ बी व्हिसाधारकांनाही काम करण्यास परवानगी देण्यात येईल. अमेरिकेत असे पाच लाख भारतीयांकडे अमेरिकेत वास्तव्य करण्यास वैध कागदपत्रे नाहीत. हा कायदा त्यांच्यासाठी नागरिकतेची दारे उघडणार आहे