अभिनेता सचिन देशपांडेची भन्नाट आयडिया; लेकीचा ‘व्हर्च्युअल नामकरण सोहळा’

0
206

राज्यातील कोरोना रुग्णसंख्येत पुन्हा एकदा वाढ दिसून येत आहे. त्यामुळे अनेक समारंभ रद्द होत आहेत. मात्र, तरीही लग्न किंवा इतर समारंभात गर्दी होतांना दिसते. त्यामुळे प्रशासनाने कडक भूमीका घेतली आहे. छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेता सचिन देशपांडेने काही दिवसांपूर्वी बाबा झाला असून आता त्याच्या लेकीचा व्हर्च्युअल नामकरण सोहळा पार पडला आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता सचिनने भन्नाट आयडिया वापरुन मुलीचा व्हर्च्युअल नामकरण सोहळा करण्याचा एक वेगळा प्रयत्न त्याने केल्याचे दिसत आहे.

सचिनने मुलीच्या नामकरण सोहळ्याचा व्हिडीओ फेसबुकवर शेअर केला आहे. ‘नमस्कार, सध्याच्या कोविड परिस्थितीमुळे, कुठलाही समारंभ करण्यावर अनेक बंधनं आली आहेत, पण त्याच बरोबर सोहळे, समारंभ साजरा करण्याच्या नवनवीन कल्पना ही येऊ लागल्या आहेत. म्हणूनच आमच्या मुलीचा व्हर्च्युअल नामकरण सोहळा करण्याचा एक वेगळा प्रयत्न आम्ही करतो आहोत. तुम्हाला विनंती आहे की हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आमच्या लेकीला आशीर्वादही नक्की द्या’ असे सचिनने व्हिडीओ पोस्ट करत म्हटले आहे.

नेता असो की अभिनेता त्यांचे अनुकरण सामान्य नागरिक करत असतात. त्यामुळे त्यांच्याकडून कायमच चांगल्या वर्तनाची अपेक्षा केली जाते. राज्यात कोरोना रुग्ण संख्येत वाढ होत असल्याने, अनेकांनी आप-आपले कार्यक्रम रद्द केले आहे. अनेक शहरातील शाळा देखील पुन्हा बंद करण्यात आल्या आहेत. या सर्वांचा विचार करता, अभिनेता सचिनने घेतलेला हा निर्णय नक्कीच कौतूकास्पद म्हणावा लागेल.