Realme C21: रियलमी सी २१ स्मार्टफोन ५ मार्चला होणार लाँच

0
232

सध्या रिअलमी (Realme) कंपनीचे स्मार्टफोन बाजारात मोठी पसंती मिळवत असल्याचे दिसत आहे. यातच या कंपनीची सी सीरिजचा अगामी स्मार्टफोन रिअलमी सी21 (Realme C21) कधी लॉन्च होणार? याबाबत रिअलमी स्मार्टफोन चाहत्यांमध्ये उस्तुकता होती. नुकताच कंपनीने रियलमी मलेशियाच्या फेसबुक पजेजवरून एक टीजर जारी केला आहे. कंपनीने एका टीजर वरून या स्मार्टफोनच्या लाँचिंगची घोषणा केली आहे. त्यानुसार, येत्या 5 मार्चला बाजारात दाखल होणार असल्याची माहिती समोर येत आहे.

रियलमीने स्पष्ट केले आहे की, रियलमी सी २१ मध्ये एक मोठी स्क्रीन दिली जाणार आहे. AliExpress वर लिस्टिंग वरून हे उघड झाले आहे. स्मार्टफोनला ब्लॅक आणि ब्लू कलर मध्ये आणले जाणार आहे. रिअलमी सी21 स्मार्टफोनमध्ये 6.52 इंचाचा एलसीडी (720 X 1600 पिक्सल) रेजॉलूशन स्क्रीन असणार आहे. हँडसेटमध्ये फ्रंट कॅमेऱ्यासाठी वॉटरड्रॉप स्टाइल नॉच दिले जाणार आहे. फोनमध्ये ऑक्टा कोर मीडियाटेक हीलियो जी 35 प्रोसेसर दिले जाणार आहे. तसेच 4 जीबी रॅम प्लस 64 जीबी इनबिल्ट स्टोरेज दिले जाणार आहे. याशिवाय, स्मार्टफोनमध्ये 13 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा आणि 2 मेगापिक्सलचे 2 सेन्सर देण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे. या बजेट स्मार्टफोनमध्ये 5000mAh ची बॅटरी दिली जाणार आहे. हँडसेटमध्ये रियरवर ट्रिपल कॅमेरा सेटअप दिला जाणार आहे.

या स्मार्टफोनची किंमत 11 हजार 200 ते 11 हजार 800 रुपयांपर्यंत असण्याची शक्यता आहे. हा स्मार्टफोन बाजारात आल्यानंतर मोठी पसंती मिळवेल, असा विश्वास कंपनीकडून व्यक्त करण्यात येत आहे.