कोकणात शिमग्याच्या उत्सवावार निर्बंध; गावात येण्यासाठी कोरोना रिपोर्ट बंधनकारक

0
389

कोरोना विषाणूच्या वाढत्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर आता रत्नागिरीत प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे. त्यामुळे शिमग्याच्या सणासाठी कोकणात जायला निघालेल्या चाकरमन्यांच्या उत्साहावर पाणी फेरले जाणार आहे. कोरोनाच्या (Coronavirus) पार्श्वभूमीवर रत्नागिरीचे जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी गुरुवारी यासंदर्भातील आदेश जारी केले.

कोरोनामुळे चाकरमन्यांनी कोकणात येऊ नये, असे आवाहन रत्नागिरीचे जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी केले आहे. त्यानंतरही शिमग्याच्या सणाला येणाऱ्या चाकरमान्यांनी दिलेले नियम पाळणे आवश्यक आहे.

हे’ नियम पाळणे बंधनकारक
कंटेन्मेंट झोनमधून येणाऱ्या चाकरमान्यांना कोरोना टेस्ट बंधनकारक आहे.
जिल्ह्यात प्रवेश करण्यापूर्वी 72 तास आधीचा कोरोना चाचणी अहवाल दाखवणे बंधनकारक आहे.

पालखी उत्सवावर निर्बंध
गपणती आणि होळी हे कोकणातील दोन मोठे सण मानले जातात. होळीच्या काळात कोकणातील गावांमध्ये ग्रामदेवतेच्या पालख्या निघतात. त्यासाठी शहरातील लोक मोठ्याप्रमाणावर कोकणातील आपल्या गावी जातात.

यंदाही होळीच्या काळात कोकणात अशीच गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासनाकडून आतापासूनच योग्य ती खबरदारी घेतली जात आहे. मात्र, प्रशासनाने येत्या दोन-तीन दिवसांची डेडलाईन देण्यासाठी आता उर्वरित दिवसांमध्ये कोकणाकडे जाणाऱ्यांची गर्दी वाढण्याची शक्यता आहे.

या पार्श्वभूमीवर रत्नागिरी प्रशासनाकडून पालखी उत्सवावर निर्बंध घालण्यात आले आहेत. पालखी घरोघरी नेण्यास मज्जाव करण्यात आला आहे. तर कोकणात येणाऱ्या गावकऱ्यांचे गावातही स्कॅनिंग केले जाणार आहे. तसेच गावात नमन-खेळे या कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली आहे.