भारतीय युट्यूबर्सच्या कमाईत होणार घट; गूगलच्या अमेरिकी करकपातीमुळे कमाईला लागणार कात्री

0
573

सध्याच्या युगात, व्हिडिओ स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म यूट्यूब (YouTube) हा केवळ कमाई करण्याचा एक चांगला मार्ग नाही तर याने लोकांना त्यांची प्रतिभा दर्शविण्यासाठी एक चांगलं व्यासपीठ सुद्धा उपलब्ध करून दिल आहे. याने यूट्यूबर्सला पैसे सुद्धा कमवता येत होते. परंतु आता अमेरिकेबाहेरील YouTubers कमी पैसे कमवतील. वास्तविक, आतापर्यंत जे लोक यूट्यूबवर व्हिडिओ तयार करतात त्यांना कर भरावा लागत नाही परंतु लवकरच त्यांना कर भरावा लागणार आहे. गूगल ने भारतीय यूट्यूबर्सला एक मेल पाठवून तशी चेतावणी दिली आहे. यामध्ये कंपनीने हे स्पष्ट केले आहे की 31 मेनंतर यूट्यूबच्या कमाईवर कर (Tax) आकारला जाईल.

यूट्यूब व्हिडीओमधून जी कमाई होते त्यावर आता अमेरिकी कर लागणार आहे. हा कर थोडा थोडका नसून तब्बल 24 टक्के असणार आहे. जून 2021 पासून या करकपातीची अंमलबजावणी होईल. ही करकपात कमीत कमी व्हावी यासाठी गूगलने सर्व यूट्यूबरला दिल्या आहेत. त्यानुसार आपली करविषयक कागदपत्रे यूट्यूबकडे दाखल करायची आहेत. ही कागदपत्रे दाखल करण्यासाठी 31 मे 2021 पर्यंतची मुदत आहे. जे यूट्यूबर्स ही कागदपत्रे दाखल करणार नाहीत, त्यांना सरसकट 24 टक्के करकपातीचा सामना करावा लागणार आहे. अर्थातच ही करकपात तुम्ही तुमच्या यूट्यूब चॅनेलवर अपलोड केलेल्या व्हिडिओंना अमेरिकेतील जे प्रेक्षक पाहतात त्यातून होणाऱ्या कमाईवरच द्यायचा आहे. म्हणूनच जे अमेरिकी यूट्यूबर आहेत, त्यांना या करकपातीचा सामना करावा लागणार नाही.

भारत आणि अमेरिका यांच्यात करविषयक सामंजस्य करार झालेला आहे. त्यामुळे जे भारतीय यूट्यूबर्स गूगलने सांगितलेल्यानुसार आवश्यक कागदपत्रे गूगलकडे जमा करतील त्यांना फक्त 15 टक्के करकपात सोसावी लागेल. तसंच जे यूट्यूबर कागदपत्रे सादर करतील आणि अमेरिका आणि भारत यांच्यातील कर सामंजस्य करारासाठी पात्र नसतील त्यांना मात्र 30 टक्के करकपात सोसावी लागणार आहे.

यात दिलासा देणारी गोष्ट अशी आहे की, तुम्हाला केवळ त्याचं व्यूजसाठी (YouTube Views) कर भरावा लागणार आहे जे तुम्हाला अमेरिकी दर्शकांकडून मिळाले आहेत. तसेच, अमेरिकन क्रिएटर्सना कोणताही कर भरावा लागणार नाही. याचा अर्थ असा की जर एखाद्या भारतीय यूट्यूबरचा व्हिडीओ कोणी अमेरिकेमध्ये पाहात असेल तर त्या व्यूज मधून मिळणाऱ्या कमाईवर तुम्हाला कर भरावा लागणार आहे.

कधीपासून सुरु होणार ही यूट्यूबची नवी टॅक्स पॉलिसी?

गूगलच्या (Google) मालकीची यूट्यूबची ही नवी टॅक्स पॉलिसी (Youtube tax Policy) जून 2021 पासून लागू करण्यात येणार आहे. आपल्या अधिकृत संप्रेषणात Google ने व्हिडिओ निर्मात्यांना त्यांच्या अ‍ॅडसेन्स खात्यावर कर माहिती भरण्यास सांगितलं आहे.