Realme कंपनीच्या तब्बल 108MP कॅमेरा क्षमता असलेल्या नवीन फ्लॅगशिप स्मार्टफोनची प्रतीक्षा लवकरच संपणार आहे. कंपनीचा हा लेटेस्ट फ्लॅगशिप स्मार्टफोन 24 मार्च रोजी भारतात लाँच होणार आहे. रिअलमी इंडियाचे प्रमुख माधव सेठ यांनी ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर करुन 24 मार्च रोजीच्या इव्हेंटबाबत माहिती दिली आहे. पण, इव्हेंटमध्ये नेमके कोणते प्रोडक्ट्स लाँच होतील याबाबत माहिती देण्यात आलेली नाही.
कसा असेल रियलमी 8 प्रो?
रियलमी 8 प्रो दोन वेरिएंट्समध्ये लॉन्च केला जाऊ शकतो, ज्यामध्ये 6 जीबी, 8 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज स्पेस दिली जाऊ शकते. त्याच वेळी, यूआय 2.0 आधारित Android 11 सह फोनमध्ये 4500mAh बॅटरी आणि 65 वॅट्स चार्जिंगची सुविधा दिली जाऊ शकते. कॅमेराच्या बाबतीत, या फोनमध्ये 108 मेगापिक्सलचा कॅमेरा दिला जाऊ शकतो, जो सॅमसंग ISOCELL HM2 सेन्सरसह येईल.
Realme 8 सीरिजच्या स्मार्टफोनमध्ये Helio G95 चिपसेटसोबत 6.4 इंचाचा अॅमोलेड डिस्प्ले असू शकतो. शिवाय यात 30W फास्ट चार्जिंगचा सपोर्ट असलेली 5,000mAh ची दमदार बॅटरीही मिळेल. Realme 8 Pro व्हर्जनमध्ये हा फोन 6GB रॅम + 128GB आणि 8GB रॅम + 128GB इंटर्नल स्टोरेज अशा दोन पर्यायांत उपलब्ध असू शकतो. तसेच फोनमध्ये Realme UI 2.0 बेस्ड अँड्राइड 11 चा सपोर्ट असण्याची शक्यता आहे.
24 मार्च रोजी कंपनी Realme 8 सीरिज लाँच करण्याची शक्यता आहे. 24 मार्च रोजी Realme 8 सीरिजमध्ये दोन फोन लाँच होऊ शकतात. Realme 8 आणि Realme 8 Pro हे दोन स्मार्टफोन लाँच होण्याची शक्यता असून दोन्ही स्मार्टफोनमध्ये रिअर पॅनलवर क्वॉड कॅमेरा सेटअप मिळेल.
Get ready to Capture Infinity with #realme8series as we bring the next breakthrough in smartphone photography!
Launching at 7:30PM IST (2:00PM GMT), 24th March. #InfiniteLeapWith8 #108MPCaptureInfinity pic.twitter.com/BWBKwnz0a6
— Madhav108MP (@MadhavSheth1) March 15, 2021