द बिग बुल’ हा सिनेमा ८ एप्रिला डिस्ने हॉटस्टारवर होणार प्रदर्शित

0
254

शेअर बाजारात झालेल्या घोटाळ्याचा प्रमुख सूत्रधार हर्षद मेहता याच्या आयुष्यावर आधारीत असलेला ‘बिग बुल’ या बिग बजेट सिनेमाचा टीझर आज प्रसिद्ध झाला. येत्या ८ एप्रिलला डिस्ने प्लस हॉटस्टारवर प्रेक्षकांना हा सिनेमा पाहायला मिळणार आहे. या सिनेमात अभिनेता अभिषेक बच्चन प्रमुख भूमिकेत आहे.

या सिनेमाच्या टीझरमध्ये साधारण १९८७ चा काळ दाखवला आहे. एक चष्मा घातलेली व्यक्ती चालत जाताना दिसते. त्या पार्श्वभूमीवर अजय देवगणच्या आवाजात या सिनेमातील प्रमुख पात्रांची ओळख करून देतो. या चित्रपटाचा ट्रेलर १९ मार्चला प्रेक्षकांना पाहता येईल. या चित्रपटाचं दिग्दर्शन कुकी गुलाटी यांचं आहे.तर अजय देवगणने या चित्रपटाची निर्मिती केली आहे.या चित्रपटाचा टीझर नुकताच रिलीज करण्यात आला आहे. या ३० मिनिटांच्या टीझरमध्ये एका ब्रोकरचा स्टॉक मार्केटमधला सर्वात शक्तीशाली व्यक्ती बनण्यापर्यंतचा प्रवास थोडक्यात दाखवला आहे. या चित्रपटाचा निर्माता अजय देवगण याने या टीझरमधून प्रमुख पात्राची ओळख करुन देण्यासाठी आवाज दिला आहे. या चित्रपटाच्या टीमने हा टीझर प्रदर्शित केला आहे.

या चित्रपटाची कथा हर्षद मेहताच्या आयुष्यावर आधारित असली तरी यातल्या एका सीनमध्ये अभिषेक सही करताना दिसत आहे. ही सही तो हेमंत शाह या नावाने करत आहे. त्यामुळे असं म्हणायला हरकत नाही की, निर्मात्यांनी या ठिकाणी काल्पनिक नाव वापरून कथा सांगितली आहे.

या चित्रपटाचं दिग्दर्शन कुकी गुलाटी यांचं आहे.तर अजय देवगणने या चित्रपटाची निर्मिती केली आहे. यात अभिषेक बच्चनसोबत इलियाना डिक्रुझ, निकिता दत्त, सुमित व्यास, राम कपूर, सोहम शाह हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. १९ मार्चला या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज होणार आहे.

करोना महामारीमुळे या चित्रपटाचं प्रदर्शन लांबणीवर पडलं आणि त्यामुळे निर्मात्यांनी हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला. याच विषयावर गेल्या वर्षी ‘स्कॅम १९९२- द हर्षद मेहता स्टोरी’ ही वेबसीरीज आली होती. हंसल मेहता यांचं दिग्दर्शन असलेल्या वेबसीरीजमध्ये प्रतिक गांधी या कलाकाराने प्रमुख भूमिका साकारली आहे. या वेबसीरीजला प्रेक्षक, समीक्षक दोघांचीही पसंती मिळाली.