Most Polluted Cities: जगातील ३० सर्वाधिक प्रदूषित शहरांपैकी २२ भारतात

0
487

जगातील ३० सर्वाधिक प्रदूषित शहरांपैकी २२ शहरे भारतातील आहेत, दिल्ली हे जगातील सर्वाधिक प्रदूषित राजधानीचे शहर आहे, असे आयक्यूएअर या स्विस संघटनेने मंगळवारी जाहीर केलेल्या अहवालामध्ये म्हटले आहे. 2020 मध्ये नवी दिल्ली (Delhi) सलग तिसर्‍या वर्षी जगातील सर्वाधिक प्रदूषित राजधानी ठरली आहे. फुफ्फुसांचे नुकसान करणारे वायुजनित कण पीएम 2.5 वर आधारित हवेच्या गुणवत्तेचे मोजमाप करणारे, स्विश ग्रुप आयक्यू एअरच्या अभ्यासामध्ये ही बाब समोर आली आहे.

आयक्यू एअरच्या 2020 च्या जागतिक वायु गुणवत्तेच्या अहवालानुसार, जगातील सर्वाधिक दूषित 30 शहरांपैकी (Most Polluted Cities) 22 ही भारतात आहेत. या अहवालात 106 देशांमधील डेटा संकलित केला आहे. हा अहवाल देशाच्या वार्षिक सरासरी पार्टिकल्युलेट पीएम 2.5 वर आधारित आहे.

तथापि, दिल्लीतील हवेच्या दर्जात २०१९ ते २०२० या कालावधीत १५ टक्क्यांनी सुधारणा झाली आहे, असेही अहवालामध्ये म्हटले आहे. हवेच्या दर्जात सुधारणा झाली असली तरी दिल्ली हे १० व्या क्रमांकाचे सर्वाधिक प्रदूषित शहर आहे आणि जगातील सर्वात प्रदूषित राजधानीचे शहर आहे, असे अहवालामध्ये म्हटले आहे.

जगातील ३० सर्वाधिक प्रदूषित शहरांपैकी २२ शहरे भारतातील असल्याने प्रदूषित शहरांच्या श्रेणीत भारताचे स्थान अद्याप कायम आहे. दिल्लीसह गझियाबाद, बुलंदशहर, बिसराख जलालपूर, नोइडा, ग्रेटर नोइडा, कानपूर, लखनऊ, मेरठ, आग्रा आणि मुझफ्फरनगर त्याचप्रमाणे राजस्थानातील भिवारी, फरिदाबादर्, ंजद, हिसार, फतेहाबाद, बंधवारी, गुरुग्राम, यमुनानगर, रोहतक आणि धरुहेरा आणि बिहारमधील मुझफ्फरपूर ही अन्य २१ शहरे प्रदूषित आहेत.

सर्वाधिक प्रदूषित शहरांच्या यादीत चीनमधील झिनजिआंगचा समावेश आहे त्यापाठोपाठ भारतातील नऊ शहरांचा समावेश आहे. गाझियाबाद हे जगातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वाधिक प्रदूषित शहर आहे. भारतामध्ये हवेचे प्रदूषण प्रामुख्याने वाहतूक, स्वयंपाकासाठी जाळण्यात येणारा बायोमास, वीजनिर्मिती, उद्योग, बांधकाम आणि कचरा जाळणे यामुळे होत आहे.