Samsung Galaxy A52 आणि Galaxy A72 झाले लॉन्च, ‘हे’ आहेत त्याचे फिचर्स

0
379

सॅमसंग कंपनीने बुधवारी Samsung Galaxy A52 आणि Galaxy A72 या आपल्या मोबाईल फोन्सचे लॉन्चिंग केले आहे. या फोनची चर्चा गेली अनेक दिवस सुरु होती आणि याची उत्सुकताही ताणली होती. Samsung Galaxy A52 आणि Galaxy A72 चे लूक अत्यंत शानदार आहे आणि त्यामध्ये अनेक फिचर्स उपलब्ध आहेत. Samsung Galaxy A52 ला 5G मध्ये लॉन्च केलं आहे तर Galaxy A72 केवळ 4G मध्ये लॉन्च केलं आहे.

Samsung Galaxy A52 ची वैशिष्ट्य

हे तिन्ही फोन ऑसम ब्लॅक, ऑसम ब्लू, ऑसम वॉयलेट, ऑसम व्हाईट या रंगांमध्ये आहेत. या फोनमध्ये अँड्रॉईडचं ११वं व्हर्जन आहे. यामध्ये 8GB रॅम आहे. याशिवाय कॅमेऱ्याबाबत बोलायचं झालं, तर 64MP प्रायमरी कॅमेरा, 12MP अल्ट्रा वाईड अँगल कॅमेरा, 5MP डेप्थ सेंसर आणि 5MP मायक्रो कॅमेरा आहे. Samsung Galaxy A52 5G चीही हीच वैशिष्ट्य आहेत.

सॅमसंगच्या गॅलेक्सी ए52 च्या 4जी व्हेरिएन्टला युरोपीय देशांत 349 यूरो म्हणजे 31,180 रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीने लॉन्च केलं आहे. त्याचवेळी गॅलेक्सी ए52 च्या 5जी व्हेरिएन्टला 429 यूरो म्हणजे 37,100 रुपयांना लॉन्च केलं आहे.

Galaxy A72 ची वैशिष्ट्य

यामध्येही अँड्रॉईडचं ११वं व्हर्जन आहे. 8GB रॅमसह ऑक्टा कोअर प्रोसेसर आहे. या फोनमध्ये 64MP प्रायमरी कॅमेरा, 12MP अल्ट्रा वाईड अँगल कॅमेरा, 5MP मायक्रो कॅमेरा आणि 3X ऑप्टीकल झूम सपोर्ट करणारा कॅमेरा आहे. याशिवाय 8MP टेलीफोटो कॅमेरासुद्धा आहे.

सॅमसंग गॅलेक्सी ए72 ची सुरुवातीची किंमत ही 38,830 रुपये इतकी आहे. सॅमसंगच्या ए सीरीजच्या या स्मार्टफोन्सना गॅलेक्सी एम-सीरीजच्या स्मार्टफोन्सच्या तुलनेत जास्त किंमतीत लॉन्च करण्यात आलं आहे.