National Film Award : 67 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराची घोषणा; कंगना रणौत सर्वोत्कृष्ट अभिनेत्री तर मनोज बाजपेयी- धनुष ठरले सर्वोत्कृष्ट अभिनेता

0
531

६७ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा केली गेली. करोना व्हायरसमुळे यावेळी पुरस्कारांची घोषणा उशीरा करण्यात आली. यावर्षी राष्ट्रीय पुरस्कारांसाठी एकूण ४६१ फिचर फिल्मची यादी देण्यात आली होती. राष्ट्रीय मीडिया सेंटरमध्ये आयोजित होणाऱ्या या पुरस्कारांच्या घोषणेची माहिती पीआयबीने आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून दिली आहे. २०१९ या वर्षातील पुरस्कारांची घोषणा आज केली गेली.

या कार्यक्रमात Central Board of Film Certification नुसार 1 जोनोवारी 2019 पासून ते 31 डिसेंबर 2019 पर्यंत सर्टीफाईड केलेल्या चित्रपटांचा समावेश आहे.

यामध्ये सुशांत सिंगच्या ‘छिछोरे’ चित्रपटाला सर्वश्रेष्ठ हिंदी चित्रपट पुरस्कार मिळाला आहे. तर कंगणाला सर्वेत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कार जाहीर झाला आहे. मणिकर्णिका द क्वीन ऑफ झांसी’ आणि ‘पंगा’ या चित्रपटांसाठी कंगनाला हा पुरस्कार जाहीर झाला आहे.

मनोज बाजपेयी यांना भोसले या सिनेमासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून घोषित करण्यात आले. तर धनुष यालाही असुरन या तमिळ सिनेमासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला आहे. मनोज आणि धनुष यांना हा पुरस्कार विभागून देण्यात येणार आहे.

सर्वोत्कृष्ट चित्रपटस्नेही राज्य- सिक्कीम

बेस्ट इन्वेस्टीगेटीव्ह – जक्कल
सामाजिक हक्कांवर आधारित चित्रपट- होली राईट्स (हिंदी), लाडली (हिंदी)
सर्वोत्कृष्ट पर्यावरण विषयक चित्रपट- द स्टॉर्क सेवियर्स
सर्वोत्कृष्ट अभिनेता (विभागून) – मनोज बाजपेयी (भोसले), धनुष (असूरन)
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री – कंगना राणौत (पंगा, मणिकर्णिका)
सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट- छिछोरे
बेस्ट फिल्म क्रिटिक – सोहिनी चट्टोपाध्याय

सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक – बी. प्राक (तेरी मिट्टी- केसरी)
सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका – सावनी रविंद्र (रान पेटलं – Bardo)
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री – पल्लवी जोशी (द ताश्कंद फाईल्स)
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता – विजय सेतुपती (सुपर डिलक्स)

स्पेशल ज्युरी अवॉर्ड: Oththa Seruppu Size 7 (तमिळ)
सर्वोत्कृष्ट गीतः कोलांबी- प्रभा वर्मा (मल्याळम)
सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शन: डी. इम्मान, विश्वसम सिनेमा (तामिळ)
सर्वोत्कृष्ट पार्श्वसंगीत: प्रबुद्ध बॅनर्जी, ज्येष्ठोपुत्रो सिनेमा (बंगाली)

सर्वोत्कृष्ट मेक-अप आर्टिस्ट: रणजित, सिनेमा- हेलन (मल्याळम)

सर्वोत्कृष्ट पोशाख: सुजित आणि साई, Marakkar Arabikkadalinte Simham (मल्याळम)

सर्वोत्कृष्ट प्रोडक्शन डिझाइनः आनंदी गोपाळ (मराठी)

सर्वोत्कृष्ट एडिटिंग: जर्सी (तेलगू)

सर्वोत्कृष्ट ऑडिओग्राफीः Iewduh (खासी)

सर्वोत्कृष्ट ऑडियोग्राफी (अंतिम मिश्रित ट्रॅकचे रेकॉर्डिस्ट): ओठा सेरप्पू आकार 7 (तमिळ)

सर्वोत्कृष्ट पटकथा (मूळ): ज्येष्ठोपुत्रो (बंगाली)

सर्वोत्कृष्ट पटकथा (रुपांतरित): गुमनामी (बंगाली)

फीचर फिल्म कॅटेगरी
स्पेशल मेंशन – बिरयानी (मल्यालम), Jonaki Porua (असामी), लता भगवान कारे (मराठी), पिकासो (मराठी)
बेस्ट तुलु फिल्म – पिंजारा
बेस्ट पनिया फिल्म – केंजीरा
बेस्ट मिशिंग फिल्म – अनु रुवाद बेस्ट खासी फिल्म – लेवदह
बेस्ट हरयाणवी फिल्म – छोरियां चोरों से कम नहीं होती
बेस्ट छत्तीसगढ़ी फिल्म – भुलान थे माजे
बेस्ट तेलुगु फिल्म – जर्सी
बेस्ट तमिल फिल्म – असुरन
बेस्ट हिंदी फिल्म – छिछोरे
बेस्ट मराठी फिल्म – बार्डो
बेस्ट बंगाली फिल्म – गुमनामी