कोरोनाचे वाढते रुग्ण पाहता केंद्राकडून मार्गदर्शक सूचना जाहीर

0
366

देशातील अनेक राज्यांमध्ये कोरोना रुग्णसंख्या पुन्हा एकदा वाढू लागली आहे. त्याच धर्तीवर केंद्र सरकारकडून एप्रिल महिन्यासाठी एक नव्या मार्गदर्शक सूचना आणि नियमावली जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये ट्रेस, ट्रॅक आणि ट्रीट या त्रिसूत्रीचा वापर करण्यात येणार आहे. सोबरत लसीकरणावरही भर देण्यात येणार आहे. ज्या राज्यांमध्ये आरटीपीसीआर चाचण्यांची संख्या कमी आहे, तेथे चाचण्यांची संख्या वाढवण्याचे आदेश केंद्राकडून देण्यात आले आहेत.

गाईडलाईनमध्ये सांगितले आहे की, ‘जर नवीन कोरोना रुग्ण आढळला तर त्याच वेळेस त्याच्यावर उपचार करून त्यांच्यावर नजर ठेवली पाहिजे. कॉन्ट्रॅक्ट ट्रेसिंगच्या माध्यमातून सर्व संपर्कात येणाऱ्या लोकांना क्वारंटाईन करा. कंटेन्मेंट झोनची माहिती जिल्हा कलेक्टर वेबसाईटवर अपलोड करा आणि ही यादी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाला शेअर करा.

नियमावलीमध्ये मास्क न वापरणं आणि कोरोनासाठी आखून दिलेल्या प्रतिबंधात्मक नियमांचं पालन न करणाऱ्यांवर कारवाई करत दंडवसूली करण्याचाही उल्लेख करण्यात आला आहे. शिवाय ही बाबही स्पष्ट करण्यात आली आहे, की इतर राज्यांमध्ये सुरु असणाऱ्या वाहतुकीवर कोणत्याही प्रकारचे निर्बंध तूर्तास लावले जाऊ नयेत.

लसीकरणाचा वेग कमी असणाऱ्या राज्यांबाबतही केंद्रानं चिंता व्यक्त केली असून, लसीकरण प्रक्रियेला गती देण्याला सल्ला दिला आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी अतिशय महत्त्वाच्या मुद्द्यांवर केंद्राकडून प्रकाश टाकण्यात आला आहे. महाराष्ट्र, पंजाब, गुजरात, छत्तीसगढ, कर्नाटक आणि तामिळनाडूमध्ये कोरोना रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. देशात २४ तासांत आढळले नवीन कोरोनाबाधित रुग्णांमध्ये ८१ टक्के रुग्ण या सहा राज्यातील आहेत.