OnePlus 9 आणि OnePlus 9 Pro भारतात लाँच; जाणून घ्या किंमत आणि फिचर्स

0
459

आघाडीची स्मार्टफोन कंपनी OnePlus ने अखेर भारतात आपली लेटेस्ट OnePlus 9 Series लाँच केली आहे. या सीरिजमध्ये कंपनीने बहुप्रतिक्षित वनप्लस 9, वनप्लस 9 प्रो आणि वनप्लस 9आर (OnePlus 9, OnePlus 9 PRO, OnePlus 9R) हे तीन स्मार्टफोन आणलेत. OnePlus 9 सीरिजसोबतच कंपनीने भारतीय मार्केटमध्ये OnePlus Watch देखील आणलं आहे.

OnePlus 9 स्पेसिफिकेशन्स :-
OnePlus 9 मध्ये 6.55 इंचाचा फुल एचडी+ Fluid AMOLED डिस्प्ले आहे. डिस्प्लेला प्रोटेक्शनसाठी यात कॉर्निंग गोरिल्ला ग्लास असून फोनमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 888 प्रोसेसरचा सपोर्ट मिळेल. 5G कनेक्टिव्हिटीचा सपोर्ट असलेल्या OnePlus 9 च्या 8GB+ 128GB व्हेरिअंटची किंमत 49 हजार 999 रुपये ठेवली आहे. तर, 12GB+ 256 GB व्हेरिअंटची किंमत 54 हजार 999 रुपये आहे. . फोनमध्ये १२ जीबी पर्यंत LPDDR5 रॅम आणि 256 जीबी पर्यंत स्टोरेज दिला आहे. मायक्रोएसडी कार्डच्या मदतीने स्टोरेज वाढवणे शक्य नाही. फोनमध्ये मल्टी लेयर कुलिंग सिस्टम दिले आहे. वनप्लस ९ मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. यात ४८ मेगापिक्सलचा Sony IMX689 प्रायमरी कॅमेरा सेन्सर दिला आहे. सोबत ५० मेगापिक्सल चा अल्ट्रा वाइड कॅमेरा Sony IMX766 सेंसरआणि 2 मेगापिक्सल मोनोक्रोम कॅमेरा दिला आहे. सेल्फीसाठी १६ मेगापिक्सलचा Sony IMX471 फ्रंट कॅमेरा दिला आहे.

OnePlus 9R चे फीचर्स
OnePlus 9R च्या फीचर्स मध्ये ६.५५ इंचाचा FHD+ Fluid AMOLED डिस्प्ले दिला आहे. याचा डिस्प्ले रिफ्रेश रेट 120 Hz आहे. या फोनला स्क्रीन रिझॉल्यूशन 1920×1080 पिक्सल आहे. याच फ्रंट कॅमेरा साठी कॉर्नर पंच होल सेटअप दिला आहे. Android v11 ऑपरेटिंग सिस्टम दिला आहे. या फोन मध्ये Qualcomm Snapdragon 870 प्रोसेसर दिला आहे. कंपनीने या फोनला ५ जी कनेक्टिविटी सोबत लाँच केले आहे. याच्या 8GB रॅम + 128GB इंटर्नल स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 39,999 रुपये आहे. तर, 12GB रॅम + 256GB इंटर्नल स्टोरेज मॉडेलची किंमत 43 हजार 999 रुपये आहे. वनप्लस ९ सीरीजमध्ये क्वॉड रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. याची प्रायमरी सेन्सर ४८ मेगापिक्सलचा आहे. सोबत १६ मेगापिक्सलचा वाइड अँगल कॅमेरा, ५ मेगापिक्सलचा मायक्रो सेन्सर आणि २ मेगापिक्सलचा मोनो कॅमेरा दिला आहे.

OnePlus 9 Pro स्पेसिफिकेशन्स :-
OnePlus 9 Pro मध्ये 6.7 इंचाचा QHD+ AMOLED डिस्प्ले असून पंच-होल डिझाइन आहे. फोनमध्ये अँड्रॉइड 11 ऑपरेटिंग सिस्टिमवर आधारित Oxygen OS 11 चा सपोर्ट आहे, शिवाय ऑक्टा-कोर स्नॅपड्रॅगन 888 प्रोसेसरही आहे. यात 12 GB रॅम आणि 256 GB इंटर्नल स्टोरेज आहे. हा फोन Carbon Black आणि Lake Blue अशा दोन रंगांच्या पर्यायात खरेदी करता येईल.

OnePlus Watch :-
वनप्लसने आपलं पहिलं वॉच OnePlus Watch देखील लाँच केलं आहे. या वॉचला OnePlus TV सोबत कनेक्ट करता येतं. यात 110 पेक्षा जास्त वर्कआउट मोड 1.39 इंचाचा HD AMOLED डिस्प्ले आहे. पॉवरसाठी यात 402mAh क्षमतेची बॅटरी असून एकदा पूर्ण चार्ज केल्यानंतर ही बॅटरी पाच दिवसांचा बॅकअप देते असा कंपनीचा दावा आहे. या वॉचमध्ये 4GB इंटर्नल स्टोरेज असून 16 हजार 999 रुपये इतकी याची किंमत ठेवली आहे. हे वॉच मूनलाइट सिल्वर आणि मिडनाइट ब्लॅक अशा दोन रंगांच्या पर्यायात खरेदी करता येईल.