महाराष्ट्रात कोरोनाचा ‘ताप: सर्वाधिक अ‍ॅक्टिव्ह रुग्ण असणाऱ्या १० जिल्ह्यांपैकी नऊ महाराष्ट्रात

0
237

भारतातील सर्वाधिक कोरोना प्रकरणं महाराष्ट्रात (Coronavirus in Maharashtra) आहेत. देशातील सर्वाधिक कोरोना प्रकरणं असलेल्या जिल्ह्यांमध्ये सर्वात जास्त जिल्हे हे महाराष्ट्रातीलच आहेत. सर्वात जास्त कोरोना रुग्ण असलेल्या देशातील 10 पैकी 9 जिल्हे एकट्या महाराष्ट्रातच आहेत म्हणजे जवळपास एक चतुर्थांश भाग कोरोनाने व्यापला आहे. महाराष्ट्रानेच मोदी सरकारचं टेन्शन वाढवलं आहे. तर एक शहर कर्नाटक राज्यातील आहे. अशावेळी महाराष्ट्र सरकारकडून अधिक कठोर निर्बंध लादले जाण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्रात पुणे, नागपूर, मुंबई, ठाणे आणि नाशिक हे टॉपमध्ये आहेत. याच जिल्ह्यांमध्ये कोरोनाची प्रकरणं झपाट्याने वाढत आहेत. शिवाय देशात दोन राज्यांनीच चिंता वाढवली आहे. महाराष्ट्रासह पंजाब राज्यांमध्येही कोरोनाची सर्वात जास्त रुग्ण आहेत. या दोन्ही राज्यांतील टॉप पाच जिल्ह्यांचा विचार करताही पुणे, नागपूर, मुंबई, ठाणे आणि नाशिक हे टॉपवर आहेत.

महाराष्ट्रात कठोर निर्बंधांची शक्यता
महाराष्ट्रातील कोरोनाचा प्रसार सातत्याने वाढत आहे. स्थानिक पातळीवर महापालिका आणि जिल्हा प्रशासनाकडून अनेक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. तरीही राज्यातील कोरोना रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे आता राज्य सरकार काही कठोर निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याचं कळंतय. तसे संकेत खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले आहे.

राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने वाढत राहिली तर लॉकडाऊन बाबत विचार केला जाईल. दोन दिवसांत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करुन लवकरच त्याबाबत निर्णय घेतला जाईल, असं आरोग्यमंत्र्यांनी पुण्यातील पत्रकार परिषदेत सांगितलं होतं. त्यानंतर आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक होत आहे. या बैठकीत कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कोणते निर्णय घेतले जातात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

कोरोनामुळे सर्वाधिक प्रभावित महाराष्ट्रातील शहरे

पुणे
नागपूर
मुंबई
ठाणे
नाशिक
औरंगाबाद
नांदेड
जळगाव
अकोला

“याशिवात गुजरात, मध्य प्रदेशातही चिंताजनक स्थिती आहे. गुजरातमध्ये दिवसाला १७०० तर मध्य प्रदेशात १५०० रुग्ण सापडत आहेत. गुजरातमध्ये सर्वाधिक रुग्ण सूरत, अहमदाबाद, वडोदरा, राजकोट आणि भावनगरमध्ये आहेत. मध्य प्रदेशात भोपाळ, इंदोर, जबलपूर, उज्जैन आणि बेतूलमध्ये जास्त रुग्ण आहेत,” अशी माहिती आरोग्य सचिवांनी दिली