पंतप्रधान मोदींनी घेतली मिताली राजच्या कामगिरीची दखल; क्रिकेटपटू मिताली राजने मानले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार

0
288

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ‘मन की बात’ या रेडिओ कार्यक्रमातून आपले विचार जनतेपर्यंत पोहोचवत असतात. तसेच उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्यांचे ते कौतुक देखील करत असतात. अशातच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १०००० धावा करणाऱ्या मिथाली राजचे त्यांनी कौतुक करत म्हटले आहे की, “मिथाली राज हीने नुकतेच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १०००० धावा केल्या आहेत. असा पराक्रम करणारी ती पहिली भारतीय महिला क्रिकेटपटू ठरली आहे. तिने केलेल्या या पराक्रमाबद्दल मी तिचे अभिनंदन करतो.”

भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार मिताली राज हिने प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटेल असा पराक्रम केला आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १० हजार धावांचा टप्पा ओलांडणारी मिताली राज ही पहिली भारतीय महिला क्रिकेटपटू ठरली आहे. आपल्या सर्वांना हे जाणुन अजून आनंद होईल की, हा टप्पा पार करणारी मिताली राज ही जगभरातील केवळ दुसरी महिला क्रिकेटपटू ठरली आहे.

तसेच त्यांनी नेमबाजी विश्वचषक स्पर्धेत चमकदार कामगिरी करणाऱ्या महिला खेळाडूंचे देखील कौतुक केले आहे. या महिला खेळाडूंचे कौतुक करताना ते म्हणाले, “मार्च महिन्यात आपण महिला दिवस साजरा करत आहोत. अनेक महिला खेळाडूंनी अनेक पदके आपल्या नावावर केली आहेत.

पंतप्रधानांच्या अभिनंदनाबद्दल मिताली राज हिने त्यांचे आभार मानले आहेत. ती म्हणाली की, मी केलेल्या विक्रमाबद्दल नरेंद्र मोदींनी केलेल्या प्रशंसेमुळे मी भारावून गेली आहे. हा माझ्यासाठी खूप मोठा गौरव आहे.