Suez Canal :अखेर सुएज कालव्यात अडकलेलं कार्गो शिप निघालं;लवकरच वाहतुक सुरळीत

0
289

इजिप्तमधील सुएझ कालव्यात गेल्या काही दिवसांपासून एव्हरग्रीन नावाचे महाकाय जहाज अडकले होते. त्यामुळे आशियामधून युरोप आणि आखाती देशांमध्ये जाणाऱ्या व्यापारी जहाजांचे दळणवळण थांबले होते.

गेल्या मंगळवारपासून सुएझ कालव्यात अडकलेल्या या जहाजाला काढण्यात काही अंशी यश आले आहे. जहाज सुरू करण्यात प्राधिकरणाला यश आले आहे. कालव्याचे व्यवस्थापन करणाऱ्या कंपन्यांनी ही माहिती दिली आहे.

आशिया आणि युरोपला जोडणारा आणि भू-राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्वाचा असणारा इजिप्तचा सुएज कालवा गेल्या काही दिवसांपासून ब्लॉक झाला होता. सोसाट्याने सुटलेल्या समुद्री वाऱ्यामुळे माल वाहतूक करणाऱ्या एका महाकाय कार्गो शीपची दिशा बदलली आणि ते या चिंचोळ्या कालव्यात अडकलं. त्यामुळे या समुद्री मार्गे होणारी वाहतूक थांबली असून जगाचे दर तासाला तब्बल 2800 कोटी रुपयांचे नुकसान होत होतं. महत्वाचं म्हणजे या एव्हरग्रीन जहाजावरील सर्व 25 क्रू भारतीय आहे.

मंगळवारी सकाळी 7.40 च्या सुमारास, चीनमधून माल भरुन एक कार्गो शीप नेदरलॅन्डला रवाना होत असताना या कालव्यात फसलं. समुद्री वाऱ्याच्या जोराच्या झोक्याने या जहाजाला दुसऱ्या दिशेला फिरवलं त्यामुळे चालकाचं जहाजावरचं नियंत्रण सुटल्याने हे 400 मीटर लांबीचं आणि 59 मीटर रुंदीचं जहाज या कालव्यात फसलं. त्यामुळे हा समुद्री मार्ग ब्लॉक होऊन समुद्रात जहाजांचं ट्रॅफिक जाम झालं होतं. बुधवारी इजिप्तच्या प्रशासनाकडून कालव्यात हे फसलेलं जहाज बाजूला करण्यासाठी प्रयत्न केले गेले. त्यासाठी आठ टगबोट्सचा वापर करण्यात आला पण त्याचा काही उपयोग झाला नाही.

तैवानचे एव्हरगिव्हन हे महाकाय मालवाहू जहाज वादळात भरकटल्याने सुएझ कालव्यामध्ये अडकले होते. यामुळे दोन्ही दिशेची जलवाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. युरोपात प्रवेश करण्यासाठी आता दक्षिण आफ्रिकेला वळसा घालून जावे लागत होते. त्यामुळे या जहाजाची सुटका करण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू होते. अखेर सहाव्या दिवशी जहाजाची सुटका करणाऱ्या पथकाला यश आले असल्याचे वृत्त आहे. या मार्गातून लवकरच जलवाहतूक सुरू होणार. मात्र, कधीपासून सुरू होईल, याबाबत काहीही माहिती समोर आली नाही. सध्या जवळपास ४५० जहाज अडकले असल्याची चर्चा आहे. इजिप्तमधील स्थानिक वेळ पहाटे ४.३० वाजण्याच्या सुमारास या एव्हरगिव्हनची सुटका झाली