Corona Vaccination: सुटीच्या दिवशीही मिळणार लस; सर्व शासकीय व खासगी केंद्रावर लसीकरण सुरू राहणार

0
294

देशभरात आजपासून 45 वर्षांवरील नागरिकांच्या कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली आहे. देशात कोरोनाचे रुग्णांची रोज चिंताजनक वाढ होताना दिसत आहे. त्यामुळं केंद्र सरकारनं महत्वाचा निर्णय घेतला आहे. सार्वजनिक आणि खाजगी लसीकरण केंद्रांवर एप्रिल महिन्यामध्ये राजपत्रित सुट्टीसह सर्व सुट्ट्यांच्या दिवशीही लसीकरण केले जाणार असल्याचे केंद्र सरकारकडून सांगण्यात आलं आहे. यासंदर्भात एएनआयनं माहिती दिली आहे.

सरकारने परिस्थितीचं गांभीर्य ओळखून एप्रिल महिन्यात (April Month vaccination news) वेगानं लसीकरण करण्याचा मानस केला आहे. एप्रिल महिन्याच्या सर्व दिवशी कोरोना लसीकरण (Corona Vaccination) करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. खासकरुन सरकारी सुट्ट्यांच्या दिवशीही लसीकरण केले जाणार आहे. हा आदेश सरकारी आणि खासगी दोन्ही लसीकरण केंद्रांसाठी लागू असणार आहे.

निर्धारित वेळेत लसीकरणाची पूर्ती करण्यासाठी आणि लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी केंद्राने गुरुवारी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. सर्व शासकीय आणि खासगी करोना लसीकरण केंद्रावर सुटीच्या दिवशीही लस दिली जाणार आहे. एप्रिल महिन्याच्या कालावधीत लसीकरण केंद्र शासकीय आणि इतर सुटीच्या दिवशीही सुरूच राहणार आहेत.

केंद्र सरकारने काही दिवसांपूर्वीच केलेल्या घोषणेनुसार देशभरात ४५ वर्षांपुढील सर्वांसाठी आजपासून लसीकरण सुरू झालं आहे. आतापर्यंत करोनायोद्धे, सहव्याधी असलेल्या ४५ वर्षांपुढील व्यक्ती तसेच ६० वर्षांपुढील व्यक्तींचे लसीकरण केले जात होतं. आता मध्यमवयीन व्यक्ती करोना बाधित होण्याचं प्रमाण प्रचंड असल्यानं लसीकरणाचा विस्तार करण्याचा निर्णय केंद्राने घेतला होता.