पुण्यात मिनी लॉकडाउन; संचारबंदीची घोषणा

0
330

पुण्यातील करोनास्थितीची आढावा बैठक पार पडल्यानंतर आज पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी पत्रकारपरिषद घेऊन सविस्तर माहिती दिली. यावेळी आयुक्त सौरभ राव यांनी पुण्यातील बार, हॉटेल, रेस्टॉरंट सात दिवसांसाठी पूर्णपणे बंद राहणार असून, हॉटेलमधून होमडिलिव्हरी सेवा सुरू राहणार असल्याची घोषणा केली. तसेच, पुणे पीएमपीएल बससेवा पुढील सात दिवस बंद राहणार आहे. पुण्यात सायंकाळी ६ ते सकाळी ६ वाजेपर्यंत संचारबंदी असणार असल्याची देखील त्यांनी माहिती दिली.

गर्दी टाळण्यासाटी पीएमपी बस (PMPL Bus) बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाला पुणे शहराचे खासदार गिरीश बापट आणि महापौर मुरलीधर मोहोळ यांचा विरोध होता. मात्र शहरात वेगाने वाढत असलेल्या कोरोना संसर्गामुळे हा कठोर निर्णय घेण्यात आला. उद्यापासून नवे सर्व निर्णय लागू होणार आहेत.

पुण्यातील करोना संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी काय करता येईल, याबाबत विचार करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत आज महत्त्वाची बैठक झाली. विभागीय आयुक्त, पुण्याचे जिल्हाधिकारी, जिल्ह्यातील महापालिकांचे अधिकारी व लोकप्रतिनिधी बैठकीला उपस्थित होते. बैठकीत संपूर्ण लॉकडाऊनला विरोध करण्यात आला. त्याऐवजी कठोर निर्बंध लादण्यावर एकमत झाले. त्यानंतर पुढील सात दिवस सायंकाळी सहा ते सकाळी सहा वाजेपर्यंत संचारबंदी लावण्याचा निर्णय घेण्यात आली. विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी ही माहिती दिली. सात दिवसांनंतर पुन्हा आढावा बैठक घेऊन पुढील निर्णय घेणार असल्याचं राव यांनी सांगितलं.

  • पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपीएल) बसेस पुढील सात दिवस बंद. एसटी सेवा सुरू राहणार
  • हॉटेल, रेस्टॉरंट, बार, मॉल आणि चित्रपटगृहे बंद राहणार. हॉटेलमधून पार्सल सेवा सुरू राहणार
  • उद्योग किंवा कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी बसेसची स्वतंत्र व्यवस्था करण्याच्या सूचना दिल्या जाणार
    संध्याकाळी 6 ते सकाळी 6 पर्यंत पुणे जिल्ह्यात संचारबंदी
  • संचारबंदीच्या काळात खासगी कार्यालयांमधून घरी जाणाऱ्या कर्मचाऱ्यांना संबंधित कंपन्यांनी त्याबाबतचे पत्र दिले असेल तर त्यांच्यावर कोणतीही कारवाई होणार नाही.
  • विवाह समारंभ ५० लोकांच्या उपस्थितीत, तर अंत्यविधी २० लोकांच्या उपस्थितीत होणार
  • सर्व धार्मिक स्थळ 7 दिवस बंद राहणार
  • दिवसभर जमावबंदी, संध्याकाळी सहा ते सकाळी सहा वाजेपर्यंत संचारबंदी
    संध्याकाळी सहा ते सकाळी सहा वाजेपर्यंत संचारबंदी असेल. केवळ अत्यावश्यक सेवा सुरु राहतील. दिवसभर जमावबंदी असणार आहे
  • लग्न, आणि अंत्यसंस्कार सोडून कोणतेही सामाजिक, राजकीय कार्यक्रम होणार नाहीत, हा देखईल मोठा आणि महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.
    उद्याने ही पूर्वीप्रमाणे सकाळी सुरू राहणार
  • राजकीय, सांस्कृतिक, सार्वजनिक, धार्मिक कार्यक्रमांना बंदी