लॉकडाऊनला व्यापारी महासंघाचा विरोध ; यावेळेत तरी दुकान सुरु ठेवा

0
303

वाढता करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी राज्य सरकारने ३० एप्रिलपर्यंत कठोर निर्बंध घातले आहेत. त्या निर्बंधांची अमलबजावणी प्रत्यक्ष सोमवारी रात्री ८ पासून सुरू झाली. दरम्यान पुण्यात लॉकडाऊनला विरोध करण्यासाठी व्यापारी वर्ग रस्त्यावर उतरल्याचे चित्र पाहायला मिळाले. किराणा मालाच्या दुकानांना परवानगी देण्यात आली आहे त्याप्रमाणे आम्हालाही परवानगी दिली जावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. यामध्ये सराफा व्यापारी, कपडे विक्रेते, भांडी विक्रेते अशा अनेकांनी सहभाग घेतला होता. व्यापारी आपापल्या दुकानांसमोर उभे राहिले होते.

संपुर्ण राज्यात व्यापारी वर्ग नाराज असल्याचे चित्र असून यावर काहीतरी मार्ग काढावा अशी व्यापारी आणि कामगारांची ईच्छा आहे. राज्यातील अनेक व्यापारी संघटना आता पुन्हा लागू केलेल्या मिनी लॉकडाऊनला विरोध करत आहेत. याचपार्श्वभूमीवर ‘ऑल इंडिया ट्रेडर्स’ या व्यापारी संघटनेने राज्यातील कोरोना संसर्ग रोखण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी लॉकडाऊनदरम्यान दुकांनाच्या वेळा सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत कराव्यात अशी मागणी केली आहे. तसेच अत्यावश्यक सेवेत मेडिकलप्रमाणे इतर दुकाने, व्यावसायिकांचाही समावेश करावा अशी मागणी व्यापारी संघटना करत आहेत.

नागरिकांसाठी दैनंदिन जीवनात वस्तू व सेवा महत्वाच्या आहेत. त्यामुळे राज्यात व्यापाऱ्यांकडूनही मोठ्याप्रमाणात वस्तुंचा पुरवठा होत असतो.परंतु लॉकडाऊनमुळे व्यापारी आणि दुकांनदारांमध्ये असणारी साखळीला ब्रेक लागतो. याचा आर्थिक फटका दुकानदार आणि व्यापाऱ्यांना बसत आहे. त्यामुळे राज्यातील अनके व्यापारी संघटना, उद्योजक, व्यावसायिक राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात रस्त्यावर उतरले आहेत.