भारतीय चित्रपट उद्योगाचे जनक दादासाहेब फाळके यांची आज जयंती

0
228

भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक धुंडिराज गोविंद फाळके अर्थात दादासाहेब फाळके यांची आज जयंती. चा जन्म 30 एप्रिल 1870 रोजी झाला होता. ते एक उत्कृष्ट दिग्दर्शक असण्याबरोबरच चांगले लेखक देखील होते. 19 वर्षांच्या चित्रपट कारकीर्दीत त्यांनी 95 हून अधिक चित्रपट केले.

दादासाहेब फाळके यांना नेहमीच कलेत रस होता. त्यांना याच क्षेत्रात करिअर करण्याची इच्छा होती. 1885मध्ये त्यांनी जे जे कॉलेज ऑफ आर्टमध्ये प्रवेश घेतला. यासह त्यांनी वडोदरा येथील कलाभवन येथून पुढचे शिक्षण देखील पूर्ण केले. 1890मध्ये दादासाहेब वडोदरा येथे गेले जेथे त्यांनी काही काळ छायाचित्रकार म्हणून काम केले. आपली पहिली पत्नी आणि मुलाच्या निधनानंतर त्यांनी आपली नोकरी सोडली.  पुढे १८९० साली बडोद्याच्या कलाभवनातून त्यांनी चित्रकलेचा शिक्षणक्रम पूर्ण केला. त्याबरोबरच वास्तुकला व साचेकाम यांचाही त्यांनी अभ्यास केला. याच सुमारास प्रोसेस फोटोग्राफी, त्यांवरील प्रक्रिया व हाफ्‌टोन ब्‍लॉक करणे याचा त्यांना छंद जडला. कलाभवनाचे प्राचार्य गज्‍जर यांच्या उत्तेजनाने रतलाम येथे तीनरंगी ठसे बनविण्याची प्रक्रिया (थ्री कलर प्रोसेस), प्रकाश शिलामुद्रण (फोटोलिथो) व छायाचित्रण इ. क्षेत्रांत प्रयोग करण्याची त्यांना संधी मिळाली होती. त्यानंतर काही दिवस बडोदा येथे धंदेवाईक छायाचित्रकार तसेच रंगभूमीचे नेपथ्यकार म्हणून त्यांनी काम केले. हौशी कलावंतांना अभिनय शिकविणे, त्यांची रंगभूषा व वेशभूषा करणे यांचीही त्यांना आवड होती. अहमदाबादला १८९२ मध्ये भरलेल्या एका औद्योगिक प्रदर्शनात त्यांनी पाठविलेल्या आदर्शगृहाच्या प्रतिकृतीला सुवर्णपदक मिळाले होते. १८९५ साली गोध्रा (गुजरात) येथे छायाचित्रकार म्हणून त्यांनी व्यवसाय सुरू केला होता; परंतु १९०० मध्ये प्‍लेगने त्यांच्या पत्‍नीचे देहावसान झाले म्हणून ते परत बडोद्याला गेले. तेथेच १९०१ साली त्यांनी एका जर्मन जादूगाराचे शिष्यत्व पतकरले.

लक्षवेधी बाब म्हणजे आपल्या बायकोचे दागिने, आपली सर्व मालमत्ता, विम्याची रक्कम हे सर्व गहाण ठेवून त्यांनी चित्रपटासाठी लागणारं साहित्य खरेदी केलं. अन् 3 मे 1913 साली राजा हरिश्चंद्र हा भारतातील पहिला चित्रपट मुंबईतील सँड्हर्स्ट रोडवरील नानासाहेब चित्रे यांच्या कोरोनेशन थिएटरमध्ये त्यांनी प्रदर्शित केला. हा चित्रपट तयार करताना त्यांना अनेक अडचणी आल्या. अगदी कलाकार गोळा करण्यापासून समाजाचा विरोध झेलेपर्यंत त्यांनी सर्वकाही सहन केलं. पण ते आपल्या ध्येयावर ठाम राहिले अन् चित्रपट तयार केलाच. विशेष म्हणजे हा पहिला चित्रपट तयार करण्यासाठी त्याकाळी त्यांना तब्बल पाच हजार रुपये इतका खर्च आला होता. पुढे त्यांनी मोहिनी भस्मासूर, बर्थ ऑफ श्री क्रृष्ण, सेतू बंधन, भक्त प्रल्हाद यांसारख्या 100 हून अधिक मूकपटांची निर्मिती त्यांनी केली. त्यांच्यामुळंच भारतात चित्रपट उद्योगाची सुरुवात झाली.

दादासाहेबांची चित्रपटनिर्मिती सुरूच होती. त्यांनी १९१७ मध्ये लंकादहन या चित्रपटाची निर्मिती केली. लंकादहनने त्या काळातील चित्रपटांचे सर्व रेकॉर्ड मोडले. मद्रास येथे या चित्रपटाच्या तिकीटविक्रीची जमा झालेली चिल्लर पोत्यात भरून बैलगाडीतून पोलीस बंदोबस्तात न्यावी लागली. तद्नंतर त्यांनी How Films are made (१९१७), श्रीकृष्ण जन्म (१९१८), कालिया मर्दन (१९१९), भक्त प्रल्हाद (१९२०) हे अविस्मरणीय चित्रपट निर्माण केले. दरम्यान मूक चित्रपटांचा जमाना संपून बोलपटाचे युग सुरू झाले होते. १९३२ मध्ये बोलपटाचा जमाना आला. दादासाहेबांनी सेतुबंधन या मूकपटाचे डबिंग करुन तो बोलपट बनवला. पुढे कोल्हापूर सिनेटोन कंपनीसाठी दादासाहेबांनी १९३७ मध्ये गंगावतरण हा चित्रपट दिग्दर्शित केला. हाच चित्रपट दादासाहेबांचा शेवटचा चित्रपट ठरला.

चित्रपट कारकिर्द

फाळके यांनी ५२ मूकपट, गंगावतरण बोलपट , अनुबोधपटांबरोबर ३० लघुपटांची निर्मीती केली. ३ मे १९१३ रोजी मुंबई च्या कॉरनेशन चित्रपटगृहात “राजा हरिश्चंद्र” चित्रपट प्रदर्शित झाला आणि दादासाहेबांचे नाव जागतिक पातळीवर “भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक” म्हणून नोंदविले गेले.

दादासाहेबांचा अंतिम काळ मात्र कष्टदायक गेला. १६ फेब्रुवारी १९४४ रोजी नाशिक येथे फाळके युगाचा अस्त झाला. दादासाहेब फाळके यांचे स्मारक नाशिक येथे आहे. तसेच महाराष्ट्र शासनाच्या अखत्यारीत असलेली दादासाहेब फाळके चित्रनगरी गोरेगाव येथे मोठ्या दिमाखाने उभी आहे. या ठिकाणी त्यांचा एक सुरेख पूर्णाकृती पुतळा देखील आहे. भारतीय पोस्ट विभागाने दादासाहेब फाळके यांच्या स्मरणार्थ तिकिट देखील काढले आहे.

फाळके पुरस्कार विजेते

दादासाहेबांनी भारतीय चित्रपटसृष्टीसाठी केलेल्या योगदानाच्या सन्मानार्थ अत्यंत मानाचा प्रतिष्ठेचा असा समजला जाणारा दादासाहेब फाळके पुरस्कार भारत सरकारने दादासाहेबांच्या जन्मशताब्दीनिमित्त सन १९६९ पासून सुरू केला. पहिल्या पुरस्काराच्या मानकरी देविका राणी ठरल्या. तर नुकताच अभिनेते रजनीकांत यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. चित्रपटसृष्टीतील पृथ्वीराज कपूर, रुबी मायर्स (सुलोचना), नितीन बोस, सोहराब मोदी, नौशाद, दुर्गा खोटे, सत्यजीत रे, व्ही.शांताराम, राज कपूर, एल.व्ही.प्रसाद, ऋषिकेश मुखर्जी, भालजी पेंढारकर, भुपेन हजारिका, मजरुह सुलतानपूरी, गीतकार प्रदिप, डॉ.राजकुमार, दादामुनी अशोक कुमार, गानसम्राज्ञी लता मंगेशकर, दिलीप कुमार, शिवाजी गणेशन, बी.आर.चोप्रा, यश चोप्रा, देव आनंद, मृणाल सेन, अदूर गोपालकृष्णन, बी.एन.सिरचार, पंकज मालिक, बी.एन.रेड्डी, धिरेंद्रनाथ गांगुली, काननदेवी, रायचंद बोराट, बी.नागी रेड्डी, आशा भोसले, जयराज, ए.नागेश्वर राव, शाम बेनेगल, तपन सिंन्हा, मन्ना डे, व्ही.के.मुर्ती, डी.रामा नायडू, के.बालचंदर, शशी कपूर व गीतकार गुलजार, सौमित्र चटर्जी, मनोज कुमार, प्राण, के. विश्वनाथ, अमिताभ बच्चन, विनोद खन्ना आदी विभूतींना हा पुरस्कार मिळाला आहे.