MI vs CSK: कायरन पोलार्डच्या झंझावातापुढे चेन्नई निष्प्रभ; मुंबईचा चेन्नईवर थरारक विजय

0
270

अखेरच्या षटकापर्यंत रंगलेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सने चेन्नई सुपर किंग्जवर चार विकेटनी थरारक विजय मिळवला. अखेरच्या चेंडूवर दोन धावांची गरज असताना कारयन पोलार्डने विजयाचे लक्ष्य मिळवून दिले. दिल्लीमध्ये सुरु असलेल्या आयपीएल सामन्यात चेन्नईनं उभा केलेला धावांचा डोंगर पोलार्डच्या धमाकेदार 87 धावांच्या खेळीच्या बळावर मुंबईनं सर केला. शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या या सामन्यात मुंबईनं अखेर बाजी मारली. पोलार्डसह रोहित शर्मा, क्विंटन डी कॉक, क्रुणाल, हार्दिक पांड्यानंही धावांचा डोंगर पार करण्यास हातभार लावला.

त्याआधी मुंबईने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. चेन्नईनं मुंबईसमोर 219 धावांचं आव्हान ठेवलं होतं. अंबाती रायुडू, मोईन अली, फाफ डू प्लेसिसच्या शानदार अर्धशतकांच्या बळावर चेन्नईनं चार विकेट्स गमावून 218 धावा केल्या. चेन्नईची सुरुवात चांगली झाली नाही. सलामीवीर ऋतुराज गायकवाड 4 धावांवर बाद झाला. त्यानंतर आलेल्या मोईन खाननं फाफ डू प्लेसिसच्या जोडीनं चांगली खेळी केली. मोईन अलीने 36 चेंडूत 58 धावा केल्या. त्याने पाच चौकार आणि पाच षटकार लगावले. तर फाफ डू ने 28 चेंडूत 50 धावा केल्या. त्याने 4 षटकार आणि 2 चौकार लगावले. त्यानंतर आलेल्या सुरेश रैनाला केवळ 2 धावा करता आल्या. मात्र अंबाती रायुडूने मुंबईच्या गोलंदाजांना धुवुन काढले. अंबाती रायुडूने केवळ वीस चेंडूत 50 धावा पूर्ण केल्या. त्याने आपल्या खेळीत 27 चेंडूत 7 षटकार आणि 4 चौकारांसह नाबाद 72 धावांची खेळी केली. त्याला रविंद्र जाडेजानं चांगली साथ दिली. जाडेजा 22 धावांवर नाबाद राहिला.

विजयासाठी २१९ धावांचे लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या मुंबई इंडियन्सला रोहित शर्मा आणि क्विंटन डी कॉक यांनी शानदार सुरूवात करून दिली. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी ७१ धावांची भागिदारी केली. ही जोडी शार्दुल ठाकूरने फोडली. त्याने रोहित शर्माला ३५ धावांवर बाद केले. त्यानंतर मुंबईचा डाव गडगडला. रोहितच्या जागी आलेल्या सूर्यकुमार यादवला जडेजाने ३ धावांवर बाद केले. त्यानंतर मोइन अलीने डी कॉकला ३८ धावांवर माघारी पाठवले. त्यामुळे मुंबईची अवस्था शून्य बाद ७१ वरून ३ बाद ८१ अशी झाली. मुंबईचा संघ अडचणीत आलेला असताना पोलार्ड आणि क्रुणाल पांड्यानं डाव सावरला. पोलार्डनं आपला रुद्रावतार दाखवत यंदाच्या आयपीएलमधील सर्वात वेगवान अर्धशतक केवळ 17 चेंडूत झळकावलं. त्याला क्रुणालनं 32 धावा करत चांगली साथ दिली. क्रुणाल बाद झाल्यानंतर आलेल्या हार्दिक पांड्यानंही 7 चेंडूत 16 धावा करत तडाखेबाज खेळी केली.

धावांचा पाठलाग करताना मुंबई मागे पडत असताना कायरन पोलार्डने धमाकेदार फलंदाजी केली. त्याने १८ चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. या हंगामातील हे सर्वात वेगवान अर्धशतक ठरले. अखेरच्या षटकात मुंबईला विजयासाठी १६ धावांची गरज होती. पोलार्डने विजयाचे लक्ष्य अखेरच्या चेंडूवर पार करून दिले. त्याने ३४ चेंडूत ८ षटकार ६ चौकारांसह नाबाद ८७ धावा केल्या. मुंबईच्या विजयात कायरन पोलार्डने मोलाचा वाटा उचलला.