WTC फायनल: जागतिक कसोटी अजिंक्यपदाची अंतिम फेरी आणि इंग्लंडविरुद्धच्या मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर!

0
397

जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची अंतिम फेरी आणि इंग्लंड दौऱ्यासाठी शुक्रवारी भारताच्या कसोटी संघाची घोषणा करण्यात आली. दुखापतीमुळे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेतून मध्यातच माघार घेणारा रवींद्र जडेजा, हनुमा विहारी यांसह अनेक खेळाडूंचे भारतीय संघात पुनरागमन झाले आहे.

भारतीय टीममध्ये हार्दिक पांड्या आणि पृथ्वी शॉ यांचा समावेश केलेला नाही. पृथ्वी शॉनं विजय हजारे ट्रॉफी आणि आयपीएलमध्ये शानदार कामगिरी केली होती. निवडकर्त्यांनी चार सलामीवीर फलंदाजांना संघात स्थान दिलं आहे. यात रोहित शर्मा, शुभमन गिल, केएल राहुल आणि मयंक अग्रवाल यांचा समावेश आहे. केएल राहुलची नुकतीच अपेंडिक्स सर्जरी झाली आहे. तो दौऱ्याआधी फिट झाला तर त्याला संघात स्थान मिळू शकेल.

मध्यक्रमात चेतेश्वर पुजारा, कर्णधार विराट कोहली, उप-कर्णधार अजिंक्य रहाणे आणि हनुमा विहारी यांचा समावेश आहे. विकेटकिपर म्हणून ऋषभ पंतला पसंती दिली आहे. राहुलसारखंच वृद्धिमान साहा देखील फिटनेस क्लियरंस द्यावं लागणार आहे. साहा मागील मंगळवारी कोविड-19 संक्रमित झाला होता. तो दौऱ्याआधी फिट असेल त्याला संघात जागा मिळू शकेल.

साऊदम्पटन येथे १८ ते २२ जूनदरम्यान भारत-न्यूझीलंड यांच्यात जागतिक कसोटी अजिंक्यपदाची अंतिम लढत रंगणार आहे. त्यानंतर ४ ऑगस्टपासून भारत-इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळवण्यात येणार आहे. चेतन शर्मा यांच्या अध्यखतेखालील राष्ट्रीय निवड समितीने ही संघनिवड केली.

रविचंद्रन अश्विन आणि रवींद्र जडेजा स्पिन गोलंदाजी कमान संभाळतील. सोबतच अक्षर पटेल आणि वाशिंगटन सुंदर यांचाही समावेश केला आहे. तर कुलदीप यादवला संघात जागा मिळू शकलेली नाही.

वेगवान गोलंदाजांची तगडी फौज संघात आहे. मोहम्मद शमी, इशांत शर्मा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर आणि उमेश यादव यांचा संघात समावेश आहे सोबतच अभिमन्यु ईश्वरन, प्रसिद्ध कृष्णा, अर्जन नागवासवाला आणि आवेश खान या चार खेळाडूंचा स्टॅंडबाय म्हणून समावेश करण्यात आला आहे.

भारतीय संघ: विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे (उप-कर्णधार), रोहित शर्मा, शुभमन गिल, मयंक अंग्रवाल, चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी, ऋषभ पंत (विकेटकीपर), आर. अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, वॉशिंगटन सुंदर, जसप्रीत बुमराह, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकुर, उमेश यादव.

स्टँडबाय खेळाडू: अभिमन्यु ईश्वरन, प्रसिध्द कृष्णा, अवेश खान, अर्जन नागवासवाला