जागतिक थॅलसेमिया दिन: थॅलेसीमिया काय आहे त्याचे लक्षण आणि उपचाराबद्दल जाणून घ्या

0
396

थॅलसेमिया हे नाव आपण ऐकलेले असते पण हा आजार म्हणजे नेमके काय याबाबत आपल्याला पुरेशी माहिती नसते. मात्र त्याबाबत योग्य ती माहिती घेणे आवश्यक आहे. या रोगात शरीरातील (हिमोग्लोबीन) रक्त निर्माण होणाच्या प्रक्रियेत अडथळा येतो. ज्यामुळे शरीरात रक्ताची कमतरता निर्माण होते. अशावेळी रुग्णांच्या शरीरात लाल रक्तपेशींची संख्या १२० दिवसांऐवजी कमी दिवस पुरेल इतकी खाली येते. दरवर्षी 8 मे रोजी जगभरात जागतिक थॅलेसीमिया दिन साजरा केला जातो. हा एक आनुवंशिक रक्ताचा आजार आहे, जे आई वडीलां पासून मुलांना येतो. या आजाराचे लक्षण जवळपास 3 महिन्या नंतर कळून येतात. थॅलेसीमिया दिन साजरे करण्याचा मुख्य हेतू लोकांमध्ये रक्ताशी निगडित या गंभीर आजाराबद्दल जन जागृती करणे आहे.

समजा दोघांनाही (स्त्री आणि पुरुष) 25 टक्‍के थॅलसेमिया मायनर असला तर त्यांच्या बाळाला थॅलसेमिया होतो. 10 आठवड्यात केल्या जाणाऱ्या ऍन्टी-नेटल रक्त चाचणीमुळे बाळाला थॅलसेमिया आहे की नाही हे समजू शकते. थॅलसेमियाकडे उपचाराच्या दृष्टिकोनातून सुद्धा बघितले पाहिजे. थॅलसेमिया झालेले मूल, वैद्यकीय उपचारांच्या मदतीने एक सामान्य आयुष्य जगू शकते; पण त्याची तीव्रता आणि आयुष्यभर मिळणारी उपचारपद्धती ही त्याच्या स्वास्थ्य आणि उत्पादकतेवरती परिणाम करू शकते. सगळीकडे उपलब्ध असणाऱ्या या सामान्य प्रतिबंधनात्मक बाबी असल्या तरी सुद्धा जगभरात थॅलसेमियाचे प्रमाण वाढतच जाते आहे. भारतभरात ह्याची संख्या ही 2 ते 14 टक्‍के दरम्यान आढळून येते. सामान्यपणे दर वर्षाला देशात 10,000 पेक्षा अधिक मुलं थॅलसेमिया घेऊन जन्माला येतात. थॅलसेमिया असलेल्या मुलाला जीवन हे एक आव्हानच असते.

या रोगात शरीरातील (हिमोग्लोबीन) रक्त निर्माण होणाच्या प्रक्रियेत अडथळा येतो. ज्यामुळे शरीरात रक्ताची कमतरता निर्माण होते. अशा वेळी रुग्णांच्या शरीरात लाल रक्तपेशींची संख्या १२० दिवसांऐवजी कमी दिवस पुरेल इतकी खाली येते. त्याचा परिणाम सरळ शरीरातील हिमोग्लोबीनवर होतो. बिटा थॅलेसेमियाचे ट्रेटवाहक (मायनर) व दुसरा ट्रेटवाहक (मेजर) हे दोन प्रकार आहेत. बिटा थॅलेसेमिया असलेल्या रुग्णाच्या शरीरात निरोगी व्यक्तीपेक्षा फिक्कट निस्तेज व लहान आकाराच्या तांबडय़ा रक्तपेशी असतात. थोडय़ा प्रमाणात यांच्यात पंडुरोग (अ‍ॅनेमिया) असतो, परंतु याला सहसा उपचाराची गरज भासत नाही, पण या व्यक्तीद्वारे बिटा थॅलेसेमियाचे एक जनुक त्यांच्या मुलांत संक्रमित होते, तर बिटा थॅलेसेमिया (मेजर) हासुद्धा गंभीर आजार आहे. या रुग्णांच्या शरीरातील प्रत्येक पेशी जगण्यासाठी प्राणवायूचा योग्य प्रमाणात सातत्याने पुरवठा होणे गरजेचे आहे. प्राणवायू वाहून नेण्यासाठी योग्य प्रमाणात तांबडय़ा पेशींत हिमोग्लोबीन असणे अत्यावश्यक आहे. शरीरात हिमोग्लोबीन नसल्याने शरीराला गरजेइतकाही प्राणवायू न मिळाल्याने रुग्णाच्या मृत्यूचा धोका संभवतो.

बिटा थॅलेसेमियाची (मेजर) लक्षणे लहान बाळांत वयाच्या ३ ते ६ महिन्यांदरम्यान दिसू लागतात. हा आजार जडल्यानंतरच लक्षात येण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. स्त्री आणि पुरुष हे दोघेही थॅलेसेमियाचे वाहक (थॅलेसेमिया मायनर)असतील तर त्यांच्या मुलांमध्ये बिटा थॅलेसेमिया आढळून येण्याची शक्यता २५ टक्क्यांपर्यंत असते.

गंभीर थॅलेसेमियाची लक्षणे

बाळाचे वजन घटू लागते.
पोटात अन्न, दूध राहात नाही.
वारंवार ओकाऱ्या होतात.
मुलाची वाढ खुंटते.
मुलांना कमालीचा थकवा जाणवतो.
थोडय़ाही हालचालीमुळे धाप लागते.
रक्त देण्याला विलंब झाल्यास मुले निस्तेज होतात.

आजार टाळण्यासाठी

  • लग्नापूर्वी युवक-युवतीच्या रक्ताची चाचणी करणे.
  • युवक-युवती दोघेही थॅलेसेमिया वाहक असल्यास लग्न टाळावे.
  • पती-पत्नीपैकी एकही थॅलेसेमियाग्रस्त असल्यास मुलाला आजार संभावतो, ते टाळण्यासाठी पुरेशी काळजी घ्यावी.
  • गर्भवती माता थॅलेसेमिया वाहक वा रुग्ण असल्यास १० आठवडय़ांनी वेळोवेळी तज्ज्ञ डॉक्टरांकडे तपासणी करावी.
  •  वेळच्या वेळी औषधे घेणे आणि निदान पूर्ण करणे

थॅलेसीमिया आजारामागील काही तथ्ये –
थॅलेसीमिया या गंभीर आजारात भरपूर रक्त आणि औषधे लागतात. त्यासाठी भरपूर पैसे सुद्धा खर्च होतो. सगळेच या आजारांवर खर्च करू शकतात असे नाही. त्यामुळे पैसे अभावी उपचार मिळत नसल्याने वयोगट 12 ते 15 वर्षाची मुलं मरण पावतात आणि व्यवस्थित औषधोपचार मिळाल्यावर त्यांची जगण्याची प्रमाण जास्त असतात. या आजारामध्ये जसं जसं वय वाढते तसं तसं रक्ताची गरज जास्त भासू लागते. वेळच्या वेळीच योग्य ती काळजी घेऊन आपण या आजाराला ओळखणे कधी ही चांगलेच.

या साठी अस्थी मज्जा प्रत्यरोपण (बोन मॅरो ट्रान्सप्लान्टेशन) एक प्रकारची शल्य चिकित्सा असते ते करणे फायदेशीर असतं. पण हे फारच खर्चिक असते. जगभरात थॅलेसीमिया, सिकल सेल, सिकलथेल, हिमोफिलिया, या आजाराचे मुलं पैशाअभावी वयोगट 8 ते 10 वर्षांपेक्षा जास्त जगत नाही.